घरदेश-विदेशAK-47ने फायर केले होते 500 राऊंड, कृष्णानंद रायची केली होती चाळण, असे...

AK-47ने फायर केले होते 500 राऊंड, कृष्णानंद रायची केली होती चाळण, असे आहे मुख्तार अंसारीवर आरोप

Subscribe

नवी दिल्लीः गॅंगस्टर कायद्यातंर्गत गाझीपुर MP-MLA कोर्टाने मुख्तार व अफजाल अन्सारीला शनिवारी शिक्षा ठोठावली. मुख्यातरला दहा वर्षांची तर अफजालला ४ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. अन्सारी बंधुंवर विविध गुन्हे दाखल होते. त्यातील भाजपचे माजी आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या घटनेत  AK-47 रायफलने तब्बल ५०० राऊंड फायरींग झाली होती. राय यांच्यासह सात जणांचा या गोळीबारात जागीच मृत्यू झाला होता. सातही शवांचे शवविच्छेदन करण्यात आले. राय यांच्यासह सातही जणांच्या शरीरातून प्रत्येकी ६७ बुलेट काढण्यात आल्या होत्या.

गाझीपुर येथील मोहम्मदाबाद विधानसभा मतदारसंघावर १९८५ पासून २००२ पर्यंत अन्सारी बंधुंचेच वर्चस्व होते. सन २००२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेते कृष्णानंद राय यांनी अफजाल अन्सारीचा ८ हजार मतांनी पराभव केला. त्याचाच राग अन्सारी बंधुंना होता. निवडणुकीनंतर राय हे मतदारसंघात सक्रिय झाले. त्यांनी विकासकामे सुरु केली. २९ नोव्हेंबर २००५ रोजी राय हे एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला गेले होते. हे ठिकाण जवळच असल्याने राय यांनी बुलेटप्रुफ गाडी न घेता साध्या कारने प्रवास केला. उद्घाटनावरुन परत येत असताना भांवरकोल येथील बसनिया पुलिया येथे राय यांच्या गाडीसमोर एक कार आली. काय झालं हे कळण्याआधीच त्या कारमधून आठजण उतरले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरु केला. AK-47 रायफलने तब्बल ५०० राऊंड फायरींग झाली. राय यांच्यासह सात जणांचा या गोळीबारात जागीच मृत्यू झाला. सातही शवांचे शवविच्छेदन करण्यात आले. राय यांच्यासह सातही जणांच्या शरीरातून प्रत्येकी ६७ बुलेट काढण्यात आल्या.

- Advertisement -

याप्रकरणी कृष्णानंद यांच्या पत्नी अलका यांनी अन्सारी बंधु, मुन्ना बजरंगीसह अन्य काहींविरोधात गुन्हा नोंदवला. सीबीआयाने या हत्येचा तपास करावा, अशी मागणी अलका यांनी केली होती. महत्त्वाचे म्हणजे विद्यमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे प्रकरण सीबीआयकडे देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. मुख्तार या हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार आहे, असा ठपका सीबीआयने ठेवला होता. मुख्तार पाच वेळा आमदार होता. सन २००५ मध्ये मऊ येथे झालेल्या हिंसाचारात मुख्तारचे नाव आले होते. त्यानंतर तो पोलिसांना शरण आला होता. राय हत्याकांडातील मुख्य साक्षीदार राजनाथ सिंह यांचा संशयास्पद मृत्यू झाला. तरीही याचा तपास सुरु होता. पोलिसांना आरोपींविरोधात सबळ पुरावे हाती लागले नाहीत. त्यामुळे मुख्तारसह अन्य आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.

तसेच सन १९९७ मध्ये कोळसा व्यापारी नंदकिशोर रोंगता यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. नंदकिशोर यांचा भाऊ महावीर प्रसादने याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. मुख्तारने नंदकिशोर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप महावीर यांनी केला होता. मुख्तारने शुटर अताउर रहमानला नंदकिशोरच्या हत्येची सुपारी दिली होती, असेही महावीर यांचे म्हणणे होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -