नुपूर शर्मांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन करणाऱ्यांना ऑनलाईन धमक्या; आत्तापर्यंत अनेकांना अटक

आरोपी सलमानने नूपुर शर्मांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला आपले घर देण्याचे आश्वासन दिले तसेच नशेच्या अवस्थेत त्याने शर्मांविरोधात वादग्रस्त वक्तव्य देखील केली. इतकेच नाही तर सलमान चिश्त एक व्हिडिओ शेअक केला, ज्यात त्याने नुपूर शर्मांना शिरच्छेद करण्याची उघडपणे धमकी दिली आहे

arrests after murders and threatening over nupur sharma favour

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन करणाऱ्यांना खून, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. शर्मांच्या विधानाचे समर्थन केल्याने त्यांना ऑनलाईन धमक्या येत आहेत. या प्रकरणी देशभरातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली असून अनेकांना अटक केली आहे.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते, यानंतर देशासह जगभरात संतापाची लाट उसळून आली आहे. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ बोलणाऱ्यांना आता मारले जात आहे किंवा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याचप्रकारे 21 जून रोजी अमरावतीमध्ये एका केमिस्टची हत्या करण्यात आली. तर आठवड्याभरापूर्वी उदयपूरमध्ये एका टेलरची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर नुपूर शर्मांना हत्येची धमकी देणाऱ्या सलमान चिश्ती याला अजमेरमधून अटक करण्यात आली.

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी अजमेर पोलिसांनी मंगळवारी रात्री अजमेर दर्ग्याचे खादिम सलमान चिश्तीला अटक केली. याप्रकरणी सलमान चिश्तीची चौकशी करण्यात येत आहे. आरोपी सलमानने नूपुर शर्मांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला आपले घर देण्याचे आश्वासन दिले तसेच नशेच्या अवस्थेत त्याने शर्मांविरोधात वादग्रस्त वक्तव्य देखील केली. इतकेच नाही तर सलमान चिश्त एक व्हिडिओ शेअक केला, ज्यात त्याने नुपूर शर्मांना शिरच्छेद करण्याची उघडपणे धमकी दिली आहे.

उदयपूर टेलर हत्या प्रकरणी चौघांना अटक

नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केल्याबद्दल राजस्थानमधील उदयपूर येथे 28 जून रोजी टेलर कन्हैयालाल याची निर्घृण हत्या झाली. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. कन्हैयालाल हत्या प्रकरणाशी संबंधित गुन्हेगारी कटात दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन मुख्य आरोपींसह एकूण 4 जणांना अटक करण्यात आली आहे. रियाझ अख्तारी आणि गौस मोहम्मद अशी हत्या करणाऱ्या दोन आरोपींची नावे आहेत. हत्येनंतर आरोपीने एक ऑनलाइन व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यात कन्हैयालालचा शिरच्छेद करून त्याची हत्या केल्याचा दावा केला होता. दोन्ही आरोपींना राजसमंदच्या भीम परिसरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. कन्हैयालालच्या हत्येचा कट रचण्यात दोघेही सामील होते. मोहसीन आणि आसिफ अशी त्यांची नावे आहेत.

अमरावती केमिस्ट हत्याप्रकरणी सात जणांना अटक

नुपूर शर्मांच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केल्याबद्दल महाराष्ट्रातील अमरावती येथे पहिली हत्या झाली. केमिस्ट उमेश कोल्हे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी युसूफ खान हा मृत उमेश कोल्हे यांना ओळख होता. आणि यानेच उमेश कोल्हे यांची पोस्ट एका मुस्लिम ग्रुपमध्ये व्हायरल केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र हत्या करणारा इरफान शेख हा अद्याप फरार आहे.


नुपूर शर्मांविरोधातील सुप्रीम कोर्टाची टिपण्णी अपमानास्पद; ११७ मान्यवरांचे पत्र