घरदेश-विदेशकेजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर केले गंभीर आरोप

केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे सरकारवर केले गंभीर आरोप

Subscribe

मुख्यमंत्र्यावर हल्ला होणे ही साधी गोष्ट नाही. माझ्यावर हल्ले होत नाही केले जात आहे. मी अडथळा असल्यामुळे मला हटवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांनंतर पहिल्यांदा केजरीवाल प्रसार माध्यमांसमोर आले आहे. माझ्यावर होणारे हल्ले जाणूनबुजून केले जात असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. आम्ही डोळ्यात खूपतो म्हणून आम्हाला हटवण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही मात्र सरकारवर त्यांनी अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. आपल्या हल्ले होत नाही ते जाणूनबुजून घडवले जात आहे, असा दावा केजरीवाल यांनी केला. काल सचिवालयात केजरीवाल यांच्यवर एका व्यक्तीने हल्ला केला होता. हल्लात मिर्ची पावडर त्यांच्यावर फेकण्यात आली होती. मागील दोन वर्षात आपल्यावर चार हल्ले करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

काय म्हणाले केजरीवाल

माझ्यावर दोन वर्षात चार हल्ले झाले आहेत. एका मुख्यमंत्र्यावर असे हल्ले होणे ही साधी बाब नाही. हे हल्ले नागरिकांकडून होत नाही ते घडवले जातात. माझ्यावर हल्ले करण्याचे आदेश दिले जात आहेत. आम्ही त्यांच्यासाठी अडथळा ठरत आहोत. त्यामुळे हे सर्व मिळून माझ्या जीवावर उठले आहेत.- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

काय आहे नेमका प्रकार?

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली सचिवालयात आपल्या कार्यालयात आले होते. ते एक बैठक घेऊन बाहेर निघाले होते. एक अज्ञात तरुण सचिवालयाच्या बाहेर उभा होता. त्याने माचिसच्या डबीत मिरचीपूड आणली होती. केजरीवाल समोर येताच तरुणाने केजरीवाल यांच्या अंगावर मिरचीपूड टाकली. यादरम्यान, धक्काबुक्की सुद्धा झाली. या धक्काबुक्कीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला. सुदैवान केजरीवाल यांना मोठी इजा झाली नाही. पोलिसांनी केजरीवाल यांच्यावर मिरचीपूड फेकणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. या तरुणाचे नाव अनिल कुमार शर्मा असे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -