घरताज्या घडामोडीमोदींच्या गैरहजेरीवर केजरीवाल म्हणतात...

मोदींच्या गैरहजेरीवर केजरीवाल म्हणतात…

Subscribe

दिल्लीला पुढे नेण्यासाठी मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आशीर्वाद द्यावा, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.

आज दिल्लीतील रामलीला मैदानावर आपल्या संपूर्ण मंत्रीमंडळासह तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदीविषयी बोलले. ते म्हणाले की, ‘माझी केंद्र सरकारसोबत दिल्लीला पुढे घेऊन जाण्याची इच्छा आहे. दिल्लीला जगातील पहिल्या क्रमांकाचं शहर करायचं आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण दिलं होत. मात्र वाराणसीत मोदींचा कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्यामुळे दिल्लीला पुढे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला आर्शीवाद द्यावा अशी माझी इच्छा आहे.’

‘हा माझा विजय नसून तुमचा विजय आहे, प्रत्येक दिल्लीकरांचा विजय आहे. हा प्रत्येक आई, बहिणीचा, तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा विजय आहे. आम्ही गेल्या पाच वर्षात प्रत्येक दिल्लीकरांच्या आयुष्यात आनंदाचा आणण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीचा विकास झाला पाहिजे आणि येणाऱ्या पाच वर्षातही आमचा हाच प्रयत्न असेल, असं केजरीवाल म्हणाले.

- Advertisement -

७० जागांच्या या विधानसभेत ‘आप’ने ६२ जागा प्राप्त केल्या असून, भाजपला केवळ आठ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. आज केजरीवाल यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं नाही. या सोहळ्यासाठी खास दिल्लीतील जनतेला आमंत्रित करण्यात आलं होत. त्यांच्या साक्षीने अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


हेही वाचा – …म्हणून पंतप्रधान होते केजरीवालांच्या शपथविधीला गैरहजर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -