घरराजकारणगुजरात निवडणूकराष्ट्रीय पक्ष म्हणून..., गुजरात निकालावरून मनीष सिसोदियांनी दिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय पक्ष म्हणून…, गुजरात निकालावरून मनीष सिसोदियांनी दिली प्रतिक्रिया

Subscribe

Gujarat Election Result 2022 | आपला गुजरात निवडणुकीत १३ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर आपची दोन राज्यात सत्ता असल्याने त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अधिकृतपणे मिळायच्या आतच हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी राष्ट्रीय पार्टी असे पोस्टर लावण्यात आले आहेत.

Gujarat Election Result 2022 | नवी दिल्ली – गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने यंदा चांगला प्रचार केला होता. आम्हीच यावेळी जिंकून येणार, असं अरविंद केजरीवाल यांनी लेखी लिहून दिलं होतं. त्यामुळे यंदाच्या गुजरात निवडणुकीत भाजपा, आप आणि काँग्रेस यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळाली. दरम्यान, गुजरात निवडणुकीत ‘आप’ला १३ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाल्याने पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मनीष सिसोदीया यांनी गुजरातवासीयांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा – ‘आप’ देशातील आठवा राष्ट्रीय पक्ष बनणार का? निकष काय आहेत?

- Advertisement -

मनीष सिसोदीया म्हणाले की, गुजरातमधील जनतेने आम्हाला चांगली मतं दिली. याच मतांच्या जोरावर आम्ही आता राष्ट्रीय पक्ष म्हणून नावारुपाला येत आहोत. राष्ट्रीय राजकारणात शिक्षण, आरोग्य हे महत्त्वाचे मुद्दे बनत आहेत. पूर्ण देशाला शुभेच्छा.”

आपने गेल्यावेळीही गुजरात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना गुजरातमध्ये खातं उघडता आलं नव्हतं. यंदा आप पाच ते सहा जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आप यंदातरी गुजरातमध्ये खातं उघडेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, आपला गुजरात निवडणुकीत १३ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. तर आपची दोन राज्यात सत्ता असल्याने त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकतो. आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा अधिकृतपणे मिळायच्या आतच हिमाचल प्रदेशमध्ये आम आदमी राष्ट्रीय पार्टी असे पोस्टर लावण्यात आले आहेत.

- Advertisement -

राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी निकष काय?

  • तीन राज्यातील लोकसभा निवडणुकीत २ टक्के जागा जिंकणे
  • ४ राज्यात ६ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणे
  • ४ राज्यात २ विधानसभा जागांवर निवडून येणे

यापैकी कोणताही एक निकष जो पक्ष पूर्ण करू शकतो त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो.

हेही वाचा – भाजपचं दबावतंत्र! AAP नगरसेवकांना फोन, सिसोदियांचा आरोप

आपची सत्ता कुठे?

१५ वर्षांची भाजपाची सत्ता उलथवून टाकत आम आदमी पक्षाने काल दिल्ली महानगर पालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावला. तर, दिल्ली विधानसभेवरही आपची सत्ता आहे. पंजाबमध्येही आपची सत्ता असून गोव्यातही आपचे दोन आमदार आहेत.

देशात तीन दर्जाचे पक्ष

देशात तीन प्रकारचे पक्ष आहेत. राष्ट्रीय, राज्य स्तरीय आणि क्षेत्रीय पक्ष. भारतात सात राष्ट्रीय पक्ष आहेत. तर, ३५ राज्य स्तरीय पक्ष आहेत. तर क्षेत्रीय पक्षांची संख्या ३५० आहे.

देशात राष्ट्रीय पक्ष कोणते?

सध्या देशात सात राष्ट्रीय पक्ष आहेत. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी काँग्रे, तृणमूल काँग्रेस हे सात पक्ष आहेत. राष्ट्रीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेडसारख्या पक्षांना राज्य पक्षांचा दर्जा आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -