घरदेश-विदेश'सेमीफाइनल'वरुन स्पष्ट झाले की भाजप कुठेच नाही - ममता बॅनर्जी

‘सेमीफाइनल’वरुन स्पष्ट झाले की भाजप कुठेच नाही – ममता बॅनर्जी

Subscribe

२०१९ होणाऱ्या 'फायनल मॅच'च्या आधी 'सेमीफायनल' मध्ये भाजप कुठेच दिसत नसल्याची टीका ममता बॅनर्जींनी केली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची सत्ता भाजपच्या हातातून निघून जात असल्याचे चित्र दिसत आहे. या तिन्ही राज्यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. हे सर्व पाहता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०१९ होणाऱ्या ‘फायनल मॅच’च्या आधी ‘सेमीफायनल’ मध्ये भाजप कुठेच दिसत नसल्याची टीका ममता बॅनर्जींनी केली आहे. लोकशाहीमध्ये ‘मॅन ऑफ द मॅच’ नेहमी जनताच असते असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांनी एकामागे एक ट्विट करुन असे म्हटले आहे की, लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले. हा जनादेश आहे आणि हा या देशातील लोकांचा विजय आहे. हे लोकशाहीचे यश आहे आणि अन्याय, अत्याचार, एजेंसिंचा दुरुपयोग, गरीब जनता, शेतकरी, युवा, दलित, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्यांक आणि सामान्य वर्गासाठी सरकारने काहीच काम न केल्याच्या विरोधातला हा विजय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -