घरदेश-विदेशगॅंगस्टर अतिक अहमद, अशरफची गोळ्या झाडून हत्या; जय श्रीरामच्या घोषणा?

गॅंगस्टर अतिक अहमद, अशरफची गोळ्या झाडून हत्या; जय श्रीरामच्या घोषणा?

Subscribe

नवी दिल्लीः गॅंगस्टर अतिक अहमद आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयाजवळ ही घटना घडली. या दोघांना तेथे वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अचानक पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार झाला. त्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला झाला तेव्हा जय श्री रामच्या घोषणा दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

2006 मध्ये उमेश पाल यांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्यामुळे माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्याविरुद्ध 2007 मध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी या दोघांंना युपी एटीएसने अटक केली. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विन रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी पोलिसांच्या ताफ्यावर अचानक गोळीबार झाला.  संपूर्ण मीडिया तेथे होता. त्यांच्यासमोर हा हल्ला झाला. त्यामुळे हा हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला. या हल्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

 दरम्यान, अतिक अहमदचा मुलगा असद याला यूपी एसटीएफने १३ एप्रिल रोजी झाशी येथे एका चकमकीत ठार मारले. त्याच्यासोबत त्याचा साथीदार शूटर गुलाम यालाही ठार करण्यात आले आहे. हे दोघेही दिल्लीत काही दिवस आश्रयाला होते. उमेश पाल खून प्रकरणातील आरोपी असद अहमद आणि शूटर गुलाम यांना दिल्लीत असताना एन्काउंटरची भीती होती. यामुळे असद अहमद नेहमी तीन ते चार शस्त्रे सोबत बाळगत होता.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, असद अहमद हा त्याचा शूटर गुलाम याच्यासह काही शस्त्र घेऊन फरार झाला होता. दिल्लीत असताना पोलिसांच्या तावडीतून तो थोडक्यात बचावला होता. स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, माफिया डॉन अतिक अहमदचा माजी ड्रायव्हर शफीक याने असदची दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली होती. त्याने असदला त्याच्या ओळखीच्या झीशान, खालिद आणि जावेद यांच्याकडे दिल्लीला पाठवले होते. तेथे त्याचा एन्काउंटर करण्यात आला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -