घरताज्या घडामोडीएटीएम, पेन्शन, रेल्वे, गॅस सिलिंडर यासह 'हे' सात नियम आजपासून बदलले

एटीएम, पेन्शन, रेल्वे, गॅस सिलिंडर यासह ‘हे’ सात नियम आजपासून बदलले

Subscribe

तुम्हाला या नवीन नियमांपासून फायदा मिळेल, तर दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं.

भारतात १ मे २०२० पासून अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर होईल. तर दुसरीकडे तुम्हाला या नवीन नियमांपासून फायदा मिळेल, तर दुसरीकडे काही गोष्टींची काळजी न घेतल्यास तुमचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. यामध्ये निवृत्तीवेतन, एटीएम, रेल्वे, विमान कंपन्या, गॅस सिलिंडर, बचत खात्यांवरील व्याज आणि डिजिटल वॉलेटचा समावेश आहे.

मे पासून संपूर्ण पेन्शन मिळणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. सेवानिवृत्तीनंतर १५ वर्षानंतर पूर्ण पेन्शन रकमेची भरपाई करण्याची तरतूद सरकारने नुकतीच पुन्हा सुरू केली. त्याअंतर्गत आता मेपासून संपूर्ण पेन्शन सुरू केली जाईल. ज्यांनी या पर्यायाची निवड केली त्यांना काही काळानंतर पूर्वस्थितीच्या स्वरूपात संपूर्ण पेन्शन मिळते. २००९ मध्ये हा नियम मागे घेण्यात आला.

- Advertisement -

एटीएमशी संबंधित हा नियमही बदलला

देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं आहे. अधिक सावधगिरी बाळगण्यासाठी आता एटीएमसाठीही नवीन व्यवस्था निश्चित केली जाणार आहे. प्रत्येक व्यक्तीने एटीएम वापरल्यानंतर ते साफ केलं जाईल. ही प्रणाली गाझियाबाद आणि चेन्नईमध्ये सुरू झाली आहे आणि या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. हॉटस्पॉटमध्ये आता महापालिकेकडे दिवसातून दोनदा स्वच्छता होईल.


हेही वाचा – Breaking: तळीरामांसाठी गुड न्यूज; वाईन्स शॉप, पान टपऱ्या सुरु होणार

- Advertisement -

बोर्डिंग स्टेशन ४ तासांपूर्वी बदलता येणार

देशात लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद आहेत. परंतु भविष्यात रेल्वे सेवांसाठी एक नवीन नियम लागू झाला आहे. यापैकी काही नियम १ मेपासून लागू होणार आहेत, त्यानुसार आता प्रवासी चार्ट प्रसिद्ध होण्यापूर्वी चार तासांपर्यंत बोर्डिंग स्टेशन बदलता येणार आहे. तर याआधी प्रवासी प्रवासाच्या तारखेच्या २४ तास आधी त्यांचे बोर्डिंग स्टेशन बदलू शकत होते.

सिलेंडर स्वस्त

लॉकडाऊनमध्ये आज सर्वसामान्यांसाठी दिलासा मिळाला आहे. आजपासून १९ किलो आणि १४.९ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर स्वस्त झाले आहेत. तेल कंपन्या दर महिन्याच्या सुरूवातीला एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा घेतात. कर दर राज्यात वेगवेगळा असतो आणि त्यानुसार एलपीजीची किंमत बदलते.

दिल्लीत १४.२ किलोग्राम विना अनुदानित एलपीजी सिलिंडर १६२.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. यानंतर याची किंमत ५८१.५० रुपये झाली आहे, जी आधी ७४४ रुपये होती. कोलकातामध्ये त्याची किंमत ७७४.५० रुपयांवरून ५८४.५० रुपयांवर आली आहे. मुंबईत ७१४.५० रुपयांवरून ५७९ रुपये झाला आहे.

बचत खात्यावर कमी व्याज मिळणार

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने १ मे २०२० पासून बचत खात्यांवरील व्याज बदलले आहे. आता ग्राहकांना एक लाखाहून अधिक बचत ठेवी खात्यावर कमी व्याज मिळेल. एक लाखांपर्यंतच्या ठेवींवर तुम्हाला वार्षिक ३.५० टक्के आणि एका लाखाहून अधिक ठेवींवर तुम्हाला वार्षिक २.७५ टक्के व्याज मिळेल, जे आधी ३.२५ टक्के होते.


हेही वाचा – Big Breaking: लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांसाठी वाढवला


एअर इंडिया तिकिट रद्द करण्याचा शुल्क आकारणार नाही

एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीनेही नियमात बदल केला आहे. एअर इंडिया १ मेपासून प्रवाशांना मोठी सुविधा देणार आहे. त्याअंतर्गत आता प्रवाशांना तिकिटे रद्द केल्यावर कोणताही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार नाही. तिकीट बुकिंगच्या २४ तासांच्या आत रद्द करणे किंवा बदल करण्यासाठी रद्द शुल्क आकारले जाणार नाही. २४ एप्रिल रोजी कंपनीने याबाबत माहिती दिली.

पीएनबीचे डिजिटल वॉलेट बंद

आजपासून पंजाब नॅशनल बँकेने आपले डिजिटल वॉलेट बंद केले आहे. पीएनबी ग्राहक, जे पीएनबी किटी वॉलेट सुविधा वापरत आहेत, ते आता आयएमपीएस सारख्या अन्य डिजिटल पद्धती व्यवहारांसाठी वापरू शकतात. ग्राहक त्यांच्या खात्यात शिल्लक बॅलंस शून्य असल्यास त्यांचे वॉलेट खाते बंद करू शकतात. या संदर्भात, पीएनबीने म्हटलं आहे की आपल्याकडे आपल्या खात्यात पैसे असल्यास आपल्याला ते एकतर खर्च करावे लागतील किंवा आयएमपीएसद्वारे ते दुसर्‍या खात्यात हस्तांतरित करावे लागतील.

 

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -