घरदेश-विदेशदेशातील अनेक बडे असामी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर!

देशातील अनेक बडे असामी दहशतवाद्यांच्या टार्गेटवर!

Subscribe

मुंबईत घातपात घडवण्याचा कट रचणाऱ्या संशयित दहशतवाद्याला शुक्रवारी एटीएसच्या पथकाने अटक केली.  या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर अनेक बड्या असामी असल्याचा धक्कादायक खुलासा देखील अटक दहशतवादी  फैजल हसन मिर्झा याने केला आहे. इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेच्या संपर्कात असलेल्या फैजलनं याची संपूर्ण तयारी केली होती. पण त्याआधी एटीएसने त्याच्या मुसक्या आवळल्या.

मुंबईतल्या जोगेश्वरी भागातून शुक्रवारी फैजलला अटक करण्यात आली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा मनसुबा होता. शिवाय त्यांच्या टार्गेटवर अनेक बड्या व्यक्तिंचा समावेश होता, अशी माहिती फैजलनं एटीएसला दिली.  मूळचा मुंबईचा असलेला फैजल, मुंबईसह राज्यभरात झालेल्या बॉम्बस्फोटांप्रकरणी फरार असलेल्या आरोपींच्या सांगण्यावरुन शारजा येथे गेला असल्याची माहिती समोर आल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

मुंबईसह देशातील प्रसिद्ध ठिकाणी घातपात करणे, राजकीय आणि सिनेक्षेत्रातील व्यक्तींच्या हत्या करणे या उद्दिष्टांसाठी फैजलला प्रशिक्षण देण्यात आले होते. पेशाने इलेक्ट्रिशियन असलेला फैजल अन्य दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. त्यांच्या सांगण्यावरुनच तो शारजा येथे गेला. त्यानंतर दुबईतून कराचीत दहशतवादी प्रशिक्षण केंद्रात गेला. त्याठिकाणी त्याने अद्ययावत शस्त्र चालविण्याचे आणि बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण घेऊन दोन महिन्यांपूर्वीच फैजल मुंबईत परतला आणि ठरलेल्या कटाप्रमाणे घातपात घडवण्यासाठी त्याने शहरातील अतिमहत्त्वाची ठिकाणे, गर्दीची ठिकाणे यांची पाहणी केली होती.

कटाची व्यूहरचना त्याने पूर्ण केली होती. फक्त तो आदेशाची वाट पाहत असल्याचे देखील फैजलने सांगितले. प्रशिक्षणादरम्यान अनेक मोठ्या दहशवाद्यांच्या संपर्कात असल्याची कबुली फैजलने दिली. विशेष म्हणजे, इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक अमीर रेझा खानही त्याच्या संपर्कात असल्याचा खुलासा त्याने केला आहे. सध्या फैजलची अधिक चौकशी सुरु असून २१ मे पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहे इंडियन मुजाहिद्दीन?
इंडियन मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटनेची स्थापना १९९९-२००० साली अफ्ताब अन्सारी, कोलकाताचे असीफ खान यांनी केली. २००१ साली खादीम शूजचे मालक पी. आर. बर्मन यांचे अपहरण करण्यात आलं. चार कोटी रुपयांची खंडणी घेऊन त्यांना सोडण्यात आलं. त्यानंतर २००२ साली कोलकात्यातल्या अमेरिकी दुतावासावर त्यांनी हल्ला केला होता. यात ५ जण ठार तर २० जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -