घरदेश-विदेशमिशेलच्या अटकेमुळं सत्य समोर येईल - अहमद पटेल

मिशेलच्या अटकेमुळं सत्य समोर येईल – अहमद पटेल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी 'आता बघतो कसे वाचता ते' असा इशारा गांधी परिवाराला दिल्यानंतर काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'ख्रिस्तीयन मिशेलच्या अटकेमुळं आता दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल' अशी प्रतिक्रिया अहमद पटेल यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी ‘आता बघतो कसे वाचता ते’ असा इशारा गांधी परिवाराला दिल्यानंतर काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ख्रिस्तीयन मिशेलच्या अटकेमुळं आता दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल’ अशी प्रतिक्रिया अहमद पटेल यांनी दिली आहे. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाध्ये ख्रिस्तीयन मिशेलला युएईनं भारताच्या हवाली केलं. त्यानंतर त्याला दिल्लीतील सीबीआय कोर्टानं ५ दिवसांच्या सीबीआय कोठडीत रवानगी केली. मिशेलकडू ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणामध्ये अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ख्रिस्तीयन मिशेलला भारतात आणल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आता बघतो कसे वाचता ते’ असा सरळ इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिला होता. त्यावर आता, मिशेलची चौकशी होणार ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे ‘दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल’. कायदा आपलं काम करेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी दिली आहे.

 

- Advertisement -

वाचा – ‘आता बघतोच कसे वाचता ते’, मोदींचा गांधी परिवाराला इशारा

काय आहे प्रकरण

देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तिंसाठी ३ हजार ६०० कोटी रूपये खर्च करून १२ हेलिकॉप्टर्सची खरेदी केली जाणार होती. इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी असलेल्या ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार २०१० साली करण्यात आला होता. यामधील ८ हेलिकॉप्टर्स राष्ट्रपती, पंतप्रधान तसेच इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी वापरली जाणार होती. तर उर्वरित ४ इतर कारणांसाठी वापरली जाणार होती. पण, देशातील विविध लोकांना ३६० कोटी लाच दिल्याचा आरोप झाला. त्यानंतर हा व्यवहार १ जानेवारी २०१४ रोजी रद्द करण्यात आला.  या प्रकरणी माजी हवाई दलप्रमुख एस.पी. त्यागी यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हाही दाखल केला होता. यामध्ये सोनिया गांधींसह माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी, तत्कालीन प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायण, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि वीरप्पा मोईली यांची देखील नावं आली होती.

वाचा – ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण ; मध्यस्ती ख्रिस्तीयन मिशेलला CBI कोठडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -