Australia: विरोधी पक्षनेत्याचा दावा, ऑस्ट्रेलियन नेते PM मोदींची करतात ईर्षा

ऑस्ट्रेलियामध्ये विरोधी पक्षनेते पीटर डटन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियन राजकारणी पंतप्रधान मोदींचा हेवा करतात. कारण मोदी हे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात येऊन 20 हजार लोक जमवून 'मोदी-मोदी' अशा घोषणा देण्यास सक्षम आहेत, असं करणं ऑस्ट्रेलियातील कोणत्याही नेत्याला शक्य नाही म्हणूनच ऑस्ट्रेलियातील नेत्यांनी मोदींचा हेवा वाटतो, असे ते म्हणाले.

Australian leader of the Opposition peter dutton said politicials jealous of PM Modi
Australian leader of the Opposition peter dutton said politicials jealous of PM Modi

ऑस्ट्रेलियामध्ये विरोधी पक्षनेते पीटर डटन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत सत्ताधारी नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ऑस्ट्रेलियन राजकारणी पंतप्रधान मोदींचा हेवा करतात. कारण मोदी हे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात येऊन 20 हजार लोक जमवून ‘मोदी-मोदी’ अशा घोषणा देण्यास सक्षम आहेत, असं करणं ऑस्ट्रेलियातील कोणत्याही नेत्याला शक्य नाही म्हणूनच ऑस्ट्रेलियातील नेत्यांनी मोदींचा हेवा वाटतो, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना त्यांनी भारतीय समुदायाच्या कामाचे कौतुक केले. ( Australian leader of the Opposition peter dutton said politicials jealous of PM Modi )

ऑस्ट्रेलियन संसदेला संबोधित करताना विरोधी पक्षनेते डटन म्हणाले की बुधवारी एक विलक्षण घटना घडली. ऑस्ट्रेलियाच्या राजकारणातील दोन्ही बाजूंचे बरेच लोक उपस्थित होते, परंतु मी आज पंतप्रधानांना सांगितले की काल रात्री तेथील प्रत्येक राजकारण्याला हेवा वाटला की ते पीएम मोदी हे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात येऊन 20,000 लोक एकत्र जमवून त्यांच्याकडून मोदी मोदी नावाच्या घोषणा करवून घेण्यास सक्षम आहेत. हे दृष्य पाहून ऑस्ट्रेलियातील प्रत्येक नेत्याला ईर्षा झाली. विशेषतः ही लेबर पक्षाच्या नेत्यांमध्ये होती, असं म्हणत डटन यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

डटन म्हणाले की ही एक विलक्षण घटना आहे आणि मी पंतप्रधान मोदींच्या भारतीय समुदायाच्या कार्याचे खरोखर कौतुक करतो. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांसोबतच्या संबंधांचा सन्मान करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला भेट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आभार मानण्यात मी सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. खरं तर, 23 मे रोजी पीएम मोदींनी सिडनीतील कुडोस बँक एरिना येथे 20,000 हून अधिक लोकांना संबोधित केले. यावेळी लोक मोदी-मोदीच्या घोषणा देताना दिसले.

डटन यांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांवरही भाष्य केले

भारतासोबतच्या संबंधांवर बोलताना ते म्हणाले की, त्यांचे सरकार सत्तेवर असताना भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध विलक्षण आणि मजबूत होते. माजी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि डॅन टीन यांच्यासह समोरच्या बेंचवरील अनेक लोकांच्या कामाची त्यांनी कबुली दिली. ते म्हणाले की, या नेत्यांनी भारतासोबतच्या व्यापारात खूप चांगले काम केले आहे. यासाठी त्यांनी आधीच्या सरकारांचेही आभार मानले. ते म्हणाले की, मी गुरुवारी सिडनीमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. ही एक अतिशय सौहार्दपूर्ण चर्चा होती आणि आम्ही चर्चा केलेल्या विषयांची विस्तृत श्रेणी संबंधांना द्विपक्षीय समर्थन दर्शवते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी प्रवासी भारतीयांना संबोधित केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सिडनी भेटीदरम्यान एका समुदाय कार्यक्रमात प्रवाशी भारतीयांना संबोधित केलं. यादरम्यान त्यांनी परस्पर विश्वास आणि परस्पर आदर यावर भर दिला, जो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील घनिष्ठ ऐतिहासिक संबंधांचा पाया आहे.

( हेही वाचा: New Parliament building inauguration : 250हून अधिक मान्यवरांची विरोधकांवर टीका )

पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांची व्याख्या यापूर्वी 3C होती- कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी आणि मग त्यानंतर लोकशाही, प्रवाशी भारतीय आणि मैत्री आणि नंतर हे नातं ‘ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि शिक्षण’ चे प्रमुख घटक म्हणून उदयास आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, परंतु त्यांचा विश्वास आहे की हे नाते त्याहून अधिक आहे आणि ते परस्पर विश्वास आणि परस्पर आदराचे नाते आहे.