मनेका गांधींनी राजीनामा द्यावा – मुनगंटीवार

बालमृत्युची जबाबदारी घेत मनेका गांधी यांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Finance Minister Sudhir Mungantiwar

अवनी अर्थात टी-१ वाघिणीला ठार केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामधील वाद सध्या टोकाला पोहोचला आहे. अवनीला ठार करण्यासाठी मनेका गांधींनी सुधीर मुनगंटीवार यांना जबाबदार धरलं. तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. त्यावरून आता सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मनेका गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मनेका गांधी यांनी त्यांच्या काळात कुपोषणामुळे झालेल्या बालमृत्यूंची जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. अवनी वाघिण ही नरभक्षक असल्याचं सांगत तिला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरणावर जोरदार टीका देखील झाली. त्याची दखल थेट मनेका गांधी यांनी घेत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आणखीनचं तापलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिले असून या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत.

वाचा – अवनीचे बछडेही नरभक्षकच होणार – शूटर

…अन् अवनीला केलं ठार

दोन वर्षात १३ माणसांना ठार केल्याचं म्हणत अवनी अर्थात टी – १ वाघिणीला ठार करण्यात आलं. यावेळी पहिल्यांदा वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न झाला. पण तिनं गस्ती पथकावर हल्ला केल्यानं ठार केल्याचं स्पष्टीकरण संबंधित चमूकडून देण्यात आलं. दोन वर्षात १३ जणांचा बळी घेतल्यानं वाघिणीला ठार केल्याचं वनविभागानं स्पष्ट केलं. अवनीला ठार केल्यानं तिच्या दोन्ही बछड्यांच्या जगण्या प्रश्न आता समोर आलं आहे. अवनीला ठार केल्यानंतर माध्यमांसह सोशल मीडियावर देखील यासंदर्भात विरोध झाला तसेच अनेक प्रश्न उपस्थित करत चर्चा देखील झाली. त्यानंतर मनेका गांधी यांनी थेट दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केलं. त्याला मुनगंटीवार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं. दोन्ही मंत्र्यामधील हा वाद इतका टोकाला गेला की दोघांनीही आता परस्परांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

वाचा – ‘म्हणून गोळी झाडली’, अवनी वाघीण प्रकरणाची तिसरी बाजू!

वाचा – नियमानुसार अवनीला ठार केलं – मुनगंटीवार