घरदेश-विदेश'१० वर्षात खासगी हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्च तब्बल १२१ कोटी'!

‘१० वर्षात खासगी हेलिकॉप्टर प्रवासाचा खर्च तब्बल १२१ कोटी’!

Subscribe

माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी २००७ ते २०१७ या काळात खासगी विमान प्रवासावरती तब्बल १२१ कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप नवज्योत सिंग यांनी केला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली असून मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नवज्योस सिंग यांनी केली आहे.

पंजाबमध्ये बादल कुटुंबाने दहा वर्षामध्ये तब्बल 121 कोटी रूपये खासगी हेलिकॉप्टर प्रवासावरती खर्च केल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धु यांनी केला आहे. यासंपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी चौकशी करावी अशी मागणी देखील नवज्योत सिंग सिद्धु यांनी केली आहे. काँग्रेसचे नेते दलजित सिंग गिलझियन यांनी माहिती अधिकारातून ही माहिती मिळवली असून त्यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. २००७ ते २०१७ या काळात शिरोमणी अकाली दलाच्या प्रकाश सिंह बादल आणि त्यांच्या कुटुंबियांनी खासगी हेलिकॉप्टर प्रवासावरती तब्बल १२१ कोटी रूपये खर्च केल्याचा आरोप नवज्योत सिंग सिद्धु यांनी चंदीगढ येथे केला. ज्यावेळी राज्याची आर्थिक परिस्थिती खराब होती त्याचवेळी बादल कुटुंबानं केलेल्या उधळपट्टीमुळे आपल्याला धक्का बसल्याचे नवज्योत सिंग सिद्धु यांनी म्हटले आहे. यासंपूर्ण प्रकरणाची अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी सिद्धु यांनी केली आहे.

बादल कुटुंबावर आरोप

सरकारी कामांसाठी खासगी हेलिकॉप्टर वापरण्याची गरज काय? असा सवाल नवज्योत सिंग यांनी प्रकाश सिंह बादल यांना केला आहे. २००७ ते २०१७ काळात बादल कुटुंबियांच्या खासगी हेलिकॉप्टर प्रवासासाठी करोडो रूपयांचा चुराडा झाला. सरकारचे स्वत:चे हेलिकॉप्टर असताना खासगी हेलिकॉप्टर प्रवासाचा हट्ट का? असा सवाल नवज्योत सिंह सिंद्धु यांनी केला आहे. दहा वर्षात १२१ कोटी रूपये खर्च करणे हे पूर्णपणे चुकीचे असून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी नवज्योत सिंग सिद्धु यांनी केली आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेवर येऊन ९ महिने झाले. पण, या नऊ महिन्याच्या काळात केवळ २२ लाख रूपये हेलिकॉप्टर प्रवासावर खर्च झाल्याचे नवज्योत सिंग सिद्धु यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत अमरिंदर सिंग यांनी सरकारी कामासाठी एकदाही खासगी हेलिकॉप्टर वापरले नसल्याचे देखील सिंग यांनी म्हटले. शिवाय, २०१० साली प्रकाश सिंग बादल यांची पत्नी सुरिंदर कौर बादल यांच्या परदेशातील वैद्यकीय प्रवासाठी देखील ७ लाख ७९ हजार रूपये दिले गेल्याचा आरोप देखील नवज्योत सिंग यांनी केला आहे. तसेच २०१२ ते २०१३ या वर्षामध्ये १४ कोटी रूपये हा खासगी वाहतुकीवरती खर्च केल्याचे देखील नवज्योत सिंग सिद्धु यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्र्यांवरती झालेल्या या आरोपामुळे आता पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -