घरमहाराष्ट्रट्रेकिंग दरम्यान दरीत पडून तरुणीचा मृत्यू

ट्रेकिंग दरम्यान दरीत पडून तरुणीचा मृत्यू

Subscribe

तुंग किल्ल्यावरुन पडून मृत्यू झालेल्या ईशिताने यंदाच्या वर्षी दहावीत चांगले गुण पटकावले होते. ईशिताच्या अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

लोणावळ्याजवळ असलेला तुंग किल्ल्यावर रविवारी दुपारी ईशिता माटे या तरुणीचा मृत्यू झाला. मूळची पुण्याची असलेल्या ईशिताचा दरीत पडल्यामुळे दुर्देवी अंत झाला. मुंबईच्या पकमार्क इको टूर या कंपनीच्या वतीनेतुंग किल्ल्यावर एका कॅम्पचे आयोजन केले होते. यामध्ये ईशितासह मुंबईच्या १० तर पुण्यातील ५ जणांनी सहभाग घेतला होता. रविवावारी हे सर्वजण तुंग किल्ल्यावरुन खाली उतरत असताना ईशिताचा पाय घसरला आणि ती दरीत पडली. दरीत पडल्यामुळे तिच्या हाता-पायाला आणि डोक्याला जबर जखम झाली आणि यातच तिचा मृत्यू झाला. दुपारी साधारण ४ च्या सुमारास ईशिताचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

काळ आला होता…

हडपसरच्या अलसफायर बिल्डिंगमध्ये राहणारी १५ वर्षीय ईशिता माटे, रविवारी तुंग किल्ल्यावर एका खास कॅम्पमध्ये सहभाग घेण्यासाठी गेली होती. दिवसभर तुंग किल्ल्यावर भटकंती केल्यानरंतर, दुपारी ईशिता आणि तिचे १७ सहकारी गडावरुन खाली उतरु लागले. मात्र, ईशाचं दुर्देवं म्हणून एका वळणावर तिचा पाय घसरला आणि ती सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल दरीत कोसळली. दरम्यान याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले आणि हवालदार राकेश पालांडे अधिक तपास करत आहेत. ईशिताने यंदाच्या वर्षी दहावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळवले होते. ईशिताच्या असं अचानक जाण्याने तिच्या कुटुंबावर दुखा:ची लाट पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -