घरटेक-वेकOLA Cars १० हजार नव्या कामगारांना करणार भरती, १२ महिन्यात २ बिलियन...

OLA Cars १० हजार नव्या कामगारांना करणार भरती, १२ महिन्यात २ बिलियन डॉलर कमाईचे लक्ष्य

Subscribe

OLA Cars  कंपनीने विक्री आणि सेवा विभागात १० हजार नव्या कामगारांना भरती करण्याची घोषणा गुरुवारी केली आहे. यासाठी ओलाने पुढील १२ महिन्यांत त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील ओला कार्ससाठी २ अज्ब सकल व्यापारी मूल्य (GMV) निश्चित केले आहे. ओला कार्सने एका महिन्यात आपल्या मालकीच्या ५००० कार विकल्याचा दावा केला आहे. ओला कारने दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद येथे प्री-ओन्ड व्हीकलच्या वाहनांची विक्री सुरू केली. तर या आठवड्याच्या अखेरीस ओला अॅपद्वारे ही विक्री चंदीगड, जयपूर, कोलकाता आणि इंदूरपर्यंत  विस्तारित केली जाईल.

कंपनीने असा दावा केला की, ओला कार पुढील दोन महिन्यांत ३० शहरांमध्ये सुरु होईल, तर पुढील वर्षात १०० शहरांपर्यंत विस्तारीत होईल. ओला डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ओला कार्स डोरस्टेप टेस्ट ड्राईव्हसारख्या सुविधा देत आहेत. तर ७ दिवसात खरेदी केलेले वाहन परत करण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत.

- Advertisement -

ओला कार्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिरदेशमुख म्हणाले की, “ओला कारसह आम्ही कार खरेदी, मालकी आणि पुनर्विक्री योजनेसाठी देखील प्रयत्न करीत आहोत. आमचा ‘सर्वोत्तम नव्या’ शॉपिंगचा अनुभव मागणी वाढवण्यास मदत करत आहे. आमच्या पहिल्या योजनेत एका महिन्यात ५ हजारांपेक्षा अधिक जास्त कार विकल्या गेल्या आहेत. यामुळे आगामी महिन्यांत १०० शहरांमध्ये कार विक्रीचा वेगाने विस्तार करीत आहोत. विक्री आणि सेवा केंद्रांच्या माध्यमातून आत्तापर्यंत आम्ही १० हजार लोकांपर्यंत जोडले गेलो आहोत.

ओला कारचा एक भाग म्हणून ओला टेलीमॅटिक्स, एआय आणि व्हिजन आधारित सिस्टम वापरणारी सेवा केंद्रे उभारत आहोत. यात दीर्घकालीन योजनांचा भाग म्हणून ओला हे प्लॅटफॉर्म इतर ऑटोमोटिव्ह ब्रँडच्या नवीन वाहनांसाठी देखील खुले करेल.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -