घरदेश-विदेशउघड्या गटाराला दगडाने झाकले

उघड्या गटाराला दगडाने झाकले

Subscribe

बंगळुरु शहरातील एका पोलीस कॉन्स्टेबलने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. उघड्या गटारावर त्यांनी मोठा दगड ठेऊन दुर्घटना टाळण्याचा प्रयत्न केला आहे.

गोरेगाव येथील एका उघड्या गटारात एक तीन वर्षीय चिमुकला पडला असून या चिमुकल्याचे नाव दिव्यांश सिंग असे आहे. बुधवारी रात्री पासून या चिमुरड्याचा शोध सुरु आहे. ही घटना ताजी असताना सध्या एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो उघड्या गटारावर मोठा दगड ठेवून गटार झाकणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचा आहे. बंगळुरु शहरातील हा फोटो असून कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीस कॉन्स्टेबल उघड्या गटारावर दगड ठेवताना या फोटोमधून दिसत आहे. एचएसआर लेआऊट पोलीस स्टेशनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर गिरीश एम यांचा हा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

 

पोलीस कॉन्स्टेबलचे केले कौतुक

बंगळुरु शहरातील हा फोटो असून ७ जुलै रोजी या फोटोचे ट्विट करण्यात आले आहे. रविवारी रात्री गिरीश एम गस्तीवर होते. यावेळी एचएसआर येथील तिसऱ्या सेक्टरमध्ये आपल्या गाडीवर असताना त्यांनी एक महिला आमि लहान मुलगा उघड्या गटाराच्या बाजूने गेल्याचे पाहिले.यावेळी त्यांनी मपाहापालिका कर्मचाऱ्यांची वाट न पाहता त्या गटारावर मोठा दगड ठेवला. हा फोटो ट्विट करण्यात आला असून अनेकांनी हा फोटो रिट्विट केला असून ४०० हून अधिक जणांनी लाईक देखील केला आहे. तसेच अनेकांनी या फोटोवर कमेंट देत समाजात असे अनेक चांगले लोक असतात, अशी प्रतिक्रिया देखील दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -