घरक्रीडाबडोदा महिला क्रिकेट संघाच्या बसचा अपघात, 4 खेळाडूंसह कोच जखमी

बडोदा महिला क्रिकेट संघाच्या बसचा अपघात, 4 खेळाडूंसह कोच जखमी

Subscribe

बडोदाच्या महिला क्रिकेट संघाच्या बस अपघातात 4 खेळाडू आणि कोच जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी ही घटना घडली. आंध प्रदेशमध्ये टुर्नामेंटसाठी जात असताना बडोदाच्या संघाच्या बसला विशाखापट्टणममध्ये हा अपघात घडला.

बडोदाच्या महिला क्रिकेट संघाच्या बस अपघातात 4 खेळाडू आणि कोच जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी ही घटना घडली. आंध प्रदेशमध्ये टुर्नामेंटसाठी जात असताना बडोदाच्या संघाच्या बसला विशाखापट्टणममध्ये हा अपघात घडला. या अपघातात संघाची बसची एका ट्रकशी धडक झाली. अपघातात ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत संघाचे प्रशिक्षक आणि काही खेळाडू जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणत्याही व्यक्तीला गंभीर दुखापत झालेली नाही. शुक्रवारी 21 ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणमच्या ज्ञानपुरममध्ये बडोदा महिला क्रिकेट संघाची बस एका ट्रकला धडकली.

- Advertisement -

विशाखापट्टणम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात बडोदा संघाचे 4 खेळाडू आणि प्रशिक्षक जखमी झाले आहे. या सर्वांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकी अपघात कसा झाला?

- Advertisement -

बडोदा महिला क्रिकेट संघ आंध्र प्रदेशमध्ये महिला सीनियर टी-20 चॅम्पियनशिप खेळण्यासाठी गेला होता. त्यानंतर संघ आपल्या मूळ गावी वडोदरा येथे परतत होता. त्यावेळी हा अपघात झाला. कोणत्याही खेळाडूची आणि प्रशिक्षकाची दुखापत फारशी गंभीर नव्हती ही दिलासादायक बाब होती. या सर्वांना प्राथमिक उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

बडोदाचा संघ आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथे झालेल्या स्पर्धेत खेळत होता. यादरम्यान, बडोद्याने 14 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान 4 टी-20 सामने खेळले, ज्यात सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन केले आणि 3 सामने जिंकले. मुंबईविरुद्ध बडोद्याचा एकमेव पराभव झाला. संघाने 20 ऑक्टोबर रोजी सौराष्ट्रचा ७ गडी राखून पराभव केला, ज्यामध्ये संघाची कर्णधार यास्तिका भाटियाने महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाच्या या युवा फलंदाजाने नाबाद 64 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.


हेही वाचा – रद्दी विकत केद्र सरकारने जमवले 250 कोटी; वाचा कशा प्रकारे ?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -