घरताज्या घडामोडीBeating Retreat: दिल्लीत बीटिंग द रीट्रीट सोहळ्याला सुरूवात, ३०० वर्षांपेक्षा जुनी परंपरा,...

Beating Retreat: दिल्लीत बीटिंग द रीट्रीट सोहळ्याला सुरूवात, ३०० वर्षांपेक्षा जुनी परंपरा, जाणून घ्या इतिहास

Subscribe

दिल्लीत बीटिंग द रीट्रीट या सोहळ्याला सुरूवात झाली आहे. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव बीटिंग द रीट्रीट या सोहळ्याने संपन्न होतो. दिल्लीतील विजय चौकात हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यात २६ सैन्यांकडून धूनचं सादरीकरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली आहे. तसेच तीन सैन्य दलाच्या उपस्थित हा सोहळा पार पडत आहे.

दिल्लीच्या विजय चौकात देशभक्तीचं प्रदर्शन केलं जात आहे. यंदाच्या सोहळ्यात जवळपास हजार ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे. १७ व्या शतकात बीटींग द रिट्रीटला इंग्लडमध्ये सुरूवात झाली. त्यानंतर भारतात १९५० पासून या सोहळ्याला सुरूवात झाली. राष्ट्रपती सैन्यांना बॅरेकमध्ये परतण्याची परवानगी देतात. जगभरातील अनेक देशांमध्ये ही परंपरा आणि सोहळा पार पाडण्यात येतो.

- Advertisement -

सोहळ्याचं महत्त्व काय?

भारतीय लष्कराचे मेजर रॉबर्ट यांनी हा सोहळा लष्कराच्या बँडच्या प्रदर्शनासह पार पाडला होता. या सोहळ्यात राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती दर्शवली जाते. तसेच राष्ट्रपतींचं सोहळ्यात आगमन झाल्यानंतर त्यांना सॅल्यूट केलं जातं. बँड पथकानंतर रिट्रीटची धून वाजवली जाते. याचदरम्यान बँड मास्टर राष्ट्रपतींकडे जातात आणि बँड पुन्हा घेण्यासाठी सहमती दिली जाते. याचाच अर्थ असा आहे की, २६ जानेवारीचा सोहळा संपन्न झाला आहे. बँड मार्च परत जाताना सारे जहां से अच्छा या राष्ट्रगीताचं सादरीकरण करतात.

बीटिंग द रिट्रीट ही जुनी लष्करी परंपरा

बीटिंग द रिट्रीट ही शतकानुशतके ३०० वर्षांपेक्षा जुनी लष्करी परंपरा आहे. पूर्वीच्या युद्धांमध्ये सूर्यास्त झाला की युद्ध थांवबले जायचे. तसेच ते थांबल्याची धून वाजवली जायची आणि मग दोन्ही बाजूंचे सैन्य त्यांच्या छावणीमध्ये परतायचे. या जुन्या पद्धतीवरून या सोहळ्याची संकल्पना रचण्यात आली आहे. आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी या उत्सवात अनेक नवीन धूनचं सादरीकरण करण्यात आलं.

- Advertisement -

‘अबाई़़ड विथ मी’ धून वगळली

राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्या अबाई़़ड विथ मी या आवडत्या प्रार्थनेच्या सूराला यंदाच्या बिटिंग द रिट्रीट कार्यक्रमातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेस आक्रमक सुद्धा झाली होती. तसेच नवा वाद देखील निर्माण झाला होता. अबाई़़ड विथ मी ही ट्यून १८४७ मध्ये स्कॉटलँडमधील अँग्लिकन कवी हेन्री फ्रान्सिस लाइट यांनी तयार केली होती. १९५० पासून हे सूर बिटिंग द रिट्रीट या कार्यक्रमाचा एक भाग आहे. पूर्वीच्या युद्धांमध्ये सूर्यास्त झाला की युद्ध थांवबले जायचे. तसेच ते थांबल्याची धून वाजवली जायची.


हेही वाचा : Pakistan: धक्कादायक घटना! PUBG खेळण्यास नकार दिल्यामुळे आईसह दोन बहिणींची निर्घृण हत्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -