घरदेश-विदेशभीक मागून केलेली कमाई दिली शहीदांना

भीक मागून केलेली कमाई दिली शहीदांना

Subscribe

भीक मागून पैसे कमावणाऱ्या एका महिलेने आगळी-वेगळी राष्ट्रभक्ती दाखवून दिली आहे. या महिलेने आपली आयुष्यभराची जमा केलेली रक्कम शहीदांना देण्यात आली आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात देशाचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण देश सहभागी आहे. विविध राज्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी लाखो रुपयांची मदत जाहीर केली आहे. देशातील नागरीक शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करत देत आहेत. दरम्यान, राजस्थानमध्ये भीक मागणाऱ्या महिलेने आपल्या आयुष्याची कमाई शहीदांना देऊन आगळी-वेगळी देशभक्ती दाखवून दिली.

कोण आहे ती महिला?

देवकी शर्मा असं या महिलेच नाव आहे. ती गेल्या सात वर्षांपासून राजस्थानच्या अजमेरमधील माता मंदिराबाहेर भीक मागायची. अजमेरमधील बजरंग गढ येथे हे माता मंदिर आहे. सहा महिन्यांपूर्वी देवकी शर्माचं निधन झालं. त्यांनी भीक मागून सहा लाख रुपये जमवले होते. त्यांच्या इच्छेनुसार ही रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिली गेली आहे.

- Advertisement -

राजस्थानमधील शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत

मृत्यूपूर्वी देवकी शर्मा यांनी ६ लाख ६१ हजार ६०० रुपये जमा केले होते. हे पैसे त्यांनी बजरंग गढच्या बॅंक ऑफ बडोदा या बॅकेमध्ये अकाऊंट सुरु करुन त्यात जमा केले होते. मात्र, मृत्यूपूर्वी देवकी यांनी मंदिराच्या विश्वस्तांना आपली रक्कम काही चांगल्या कामांसाठी खर्च करा, असं सांगितलं होतं. त्यानुसार मंदिराचे विश्वस्त संदीप यांनी देवकी शर्मा यांची सर्व रक्कम अजमेरचे जिल्हाधिकारी विश्वमोहन शर्मा यांच्या बॅंक ड्राफ्टमध्ये सुपूर्द केली. ही रक्कम पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शदीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे. या महिलेच्या अंतिम इच्छेनुसार राजस्थानमधील शहीद जवानांच्या कुटुंबयांना मदत म्हणून हे पैसे दिले जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -