घरदेश-विदेशबंगाली अभिनेत्री पायलचा संशयास्पद मृत्यू

बंगाली अभिनेत्री पायलचा संशयास्पद मृत्यू

Subscribe

पश्चिम बंगालची छोट्या पडद्यावीर लोकप्रीय अभिनेत्री पायल चक्रवर्ती हिचा मृतदेह सिलिगुडीच्या हॉटेलमध्ये आढळला आहे. अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथील हॉटेल मध्ये बंगाली अभिनेत्री पायल चक्रवर्ती (वय ३८) हिचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस अधिकार गौरब लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी तिचा मृतदेह हॉटेलच्या रुममध्ये आढळला. पायलने मंगळवारी सायंकाळी हॉटेलमध्ये चेकइन केलं होतं. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्री पायल चक्रवर्ती हा कोलकाताच्या नेतजी नगर परिसरात राहत होती. त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. बंगालमधील टीव्ही आणि चित्रपटांमधील लोकप्रीय अभिनेत्री म्हणून पायल चक्रवर्तीची ओळख होती.

- Advertisement -

घटस्फोटामुळे तणावाखाली होती  

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मते, पायलन बुधवारी सकाळी गंगटोकसाठी रवाना होणार होती. मात्र संध्याकाळपर्यंत तिच्या रुमचा दरवाजाच उघडला गेला नाही. त्यामुळे घाबरून कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. तिच्या रूमचा दरवाजा आतून बंद होता. पायलचे वडिल प्रबीर गुहा यांच्या मते, काही दिवसांपूर्वी पायलचा घटस्फोट झाला होता. त्यानंतरपासूनच ती मानतिकरित्या अस्वस्थ होती. पायलला एक मुलगा असल्याचेही ते सांगतात.

मालिकांमधून लोकप्रीय 

पायलने ‘ऐक माशेर साहित्य सीरीज’, ‘चोखेर तारा तुई’ आणि ‘गोएंदा जी’ सारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या त्यांच्या चित्रपटांवर लक्षकेंद्रीत करत होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -