घरताज्या घडामोडीIndore Accident: बेलेश्वर महादेव मंदिराच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर, राम नवमीला 36 जणांचा...

Indore Accident: बेलेश्वर महादेव मंदिराच्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर, राम नवमीला 36 जणांचा मृत्यू

Subscribe

रामनवमीच्या दिवशी इंदूरच्या पटेल नगर येथील बेलेश्वर मंदिरात असलेल्या विहिरीचे छत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 18 नागरिक जखमी झाले. या दुर्घटनेनंतर इंदूर महापालिका आणि पोलिसांनी सोमवारी सकाळी मोठी कारवाई सुरू केली आहे. जेसीबी डंपरच्या सहाय्याने येथील बांधकाम तोडण्यात आले. तसेच, मंदिरातून मूर्तीही बाहेर काढण्यात आल्या. महापालिकेच्या या कारवाईला अनेका भाविकांनी विरोध केला. परंतु, पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावावर नियंत्रण मिळवल्याचे समजते. (bhopal police action in indore accident bulldozer also ran on stepwell temple)

मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या पटेल नगर येथील बेलेश्वर मंदिराला रविवारी मध्यरात्री 12 वाजता नोटीस लावण्यात आली. तसेच, रात्रीच जेसीबी डंपर दाखल झाले आणि सकाळी 6 वाजता कारवाई केली. त्यानंतर प्रत्येक घरासमोर पोलिस तैनात होते. या कारवाईदरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या मंदिराच्या भिंती तोडण्यात आल्या आणि त्यानंतर मंदिरातून मूर्ती काढून टाकण्यात आल्या.

- Advertisement -

महापालिकेकडून पाचहून अधिक पोकलेन मशीनसह कारवाई करण्यात येत आहे. कारवाईच्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जुनी इंदोर, भंवरकुवान, रावजी बाजार या चार पोलिस ठाण्यांचा पोलिस बंदोबस्तासाठी तैनात आहे.

महापालिकेकडून कारवाई सुरू होती, त्यावेळी रामनवमी दुर्घटनेच्या ठिकाणी लोक मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना बाहेरच थांबवण्यात आले. वाद घालणाऱ्यांवरही लाठीमार करण्यात आला. माध्यमांनाही यातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने काही ठिकाणे शोधून काढली आहेत, जिथे पायरी किंवा विहिरी अतिक्रमण करण्यात आले आहेत. सकाळी रामनवमी दुर्घटनेच्या ठिकाणी लोक मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना बाहेरच थांबवण्यात आले. वाद घालणाऱ्यांवरही लाठीमार करण्यात आला. माध्यमांनाही यातून वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

मृताच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

रामनवमीच्या दिवशी इंदूरच्या पटेल नगर येथील बेलेश्वर मंदिरात असलेल्या विहिरीचे छत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 18 नागरिक जखमी झाले. या दुर्घटनेतील मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.


हेही वाचा – धक्कादायक! चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने लावली सहप्रवाशाला आग; तिघांचा मृत्यू, 9 जण जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -