घरताज्या घडामोडीBihar Covid Guidelines: दिल्लीनंतर आता बिहारमध्ये नाईट कर्फ्यू; मंदिरे, चित्रपटगृहांना पुन्हा टाळे

Bihar Covid Guidelines: दिल्लीनंतर आता बिहारमध्ये नाईट कर्फ्यू; मंदिरे, चित्रपटगृहांना पुन्हा टाळे

Subscribe

देशात कोरोना रुग्णांची संख्या खूप वेगाने वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्य सरकारने कडक निर्बंध आणि लॉकडाऊन लागू करण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली, पश्चिम बंगालनंतर आता बिहारने देखील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक पाऊल उचलले आहे. बिहार राज्य सरकार नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला असून सर्व मंदिरे आणि चित्रपटगृह पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

बिहार सरकारच्या नव्या आदेशानुसार, रात्री १० पासून ते सकाळी वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. ६ जानेवारीपासून ते २१ जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहतील. तसेच सर्व मंदिरे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवले जाणार आहेत. चित्रपटगृह, जिम, पार्क, क्लब, स्टेडियम आणि स्विमिंग पूल पूर्णपणे बंद राहणार आहेत.

- Advertisement -

यादरम्यान रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्न सोहळ्यासाठी ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांना उपस्थितीत राहण्याची मुभा आहे. सर्व राजकीय, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ५० लोकं उपस्थितीत राहू शकतात.

- Advertisement -

९ ते १२चे वर्ग आणि कॉलेज ५० टक्क्यांच्या उपस्थितीत खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रायमरी ते आठवीपर्यंत सर्व वर्ग ऑनलाईन सुरू राहतील. याव्यतिरिक्त सर्व सरकारी आणि गैर-सरकारी कार्यालय ५० टक्क्यांच्या उपस्थिती खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

बिहारमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे बिहार सरकारने कडक पाऊल उचलले आहे. बिहारमध्ये एका दिवसात ८९३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. राजधानी पटनामध्ये सर्वाधिक ५६५ कोरोनाबाधित आढळले आहेत.


हेही वाटा – Delhi Weekend Curfew: दिल्लीत वीकेंड लॉकडाऊनची घोषणा, उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -