Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश बिसलरीची जबाबदारी 'या' व्यक्तीच्या हाती; मुलगी जयंतीसोबत पुन्हा काय बिघडले

बिसलरीची जबाबदारी ‘या’ व्यक्तीच्या हाती; मुलगी जयंतीसोबत पुन्हा काय बिघडले

Subscribe

नवी दिल्ली : देशातील पॅकेज्ड वॉटर क्षेत्रातील दिग्गज बिस्लेरी कंपनीचा टाटा समूहासोबतचा करार काही कारणाने रद्द झाल्यानंतर रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान कंपनीची जबाबदारी सांभाळेल अशा बातम्या मिडियात गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. पण आता असे समोर येत आहे की, कंपनीची जबाबदारी मुलगी सांभाळणार नसून कंपनीचे सीईओ अँजेलो जॉर्ज हे सांभाळणार आहेत.

बिसलेरी कंपनीची जबाबदारी कोणी घ्यावी यावरून सीईओ रमेश चौहान आणि त्यांची मुलगी जयंती चौहान यांच्यात मतभेद समोर येत आहेत. मुलीचा व्यवसाय सांभाळण्याची इच्छा नसल्यामुळे रमेश चौहान यांनी आता कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कंपनीचे सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवली आहे. हा निर्णय पूर्वनियोजित नव्हता त्यामुळे हा निर्णय अचानक घेतला असल्याचे समजते.

- Advertisement -

कंपनीची जबाबदारी मुलीवर देण्याची होती इच्छा
बिस्लेरीने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स (TCPL) ला 7,000 कोटी रुपयांच्या मुल्यांकनात कंपनीतील आपला हिस्सा विकण्यापासून मागे हटले होते. त्यानंतर रमेश चौहान यांनी बिस्लेरीचा लगाम त्यांची एकुलती एक मुलगी जयंतीकडे सोपवायचा निर्णय घेतला होता. या प्रकरणाशी संबंधित सूत्रांने सांगितले की, जयंतीच्या अनिच्छेमुळे कंपनीची जबाबदारी सीईओ अँजेलो जॉर्ज यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

…म्हणूनच मी कंपनी विकण्याचा निर्णय
जयंती चौहान हिने बिस्लेरी सारखा कमी मार्जिन असलेला व्यवसाय न चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे रमेश चौहान यांनी टाटा समूहाला मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, गेल्या वर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये बिस्लेरीने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडशी व्यवहार करणार होते. मुलगी जयंतीला या व्यवसायात रस नसल्याने आपण योग्य खरेदीदार शोधत असल्याचे चौहान यांनी यावेळी बिझनेस टुडेला या वृत्तसंस्थेला सांगितले होते.
टाटासोबतचा करार मोडल्यानंतर जयंती आता कौटुंबिक व्यवसायात रस दाखवत असून नव्या रणनीतीनुसार व्यवसाय पुढे नेण्याची तयारी करत असल्याचे रमेश चौहान म्हणाले होते. दरम्यान, आयपीएल संघांसोबत बिस्लेरीच्या भागीदारीत त्याची मोठी भूमिका असल्याचेही सांगितले जात होते. परंतु, काही दिवसांपासून काही गोष्टी बदलल्या आहेत. कारण मुलगी जयंतीने पॅकेज्ड वॉटर व्यवसायाचे नेतृत्व करण्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जयंती सीईओ अँजेलो जॉर्जसह बिस्लेरी इंटरनॅशनलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत राहतील.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -