घरदेश-विदेशBJP Foundation Day 2022 : स्थापना दिनासाठी भाजपने केली जोरदार तयारी, पंतप्रधान...

BJP Foundation Day 2022 : स्थापना दिनासाठी भाजपने केली जोरदार तयारी, पंतप्रधान मोदीही करणार भाषण

Subscribe

केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) ६ एप्रिल रोजी आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी पक्षाकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. भाजप नेते अरुण सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ज्यात त्यांनी सांगितले की, उद्या ठीक १० वाजता पंतप्रधान मोदी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

मंत्र्यांपासून आमदार सहभागी होणार

पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देताना अरुण सिंह म्हणाले की, भाजपच्या सर्व विभागांमध्ये, जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिरवणूक काढण्यात येणार आहे. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात सहभागी होतील. यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष भाजप मुख्यालयावर ध्वजारोहण करतील आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

सामाजिक न्याय पंधरवडा साजरा करण्याची तयारी

भाजप नेत्याच्या वतीने सांगण्यात आले की, पक्षाने निर्णय घेतला आहे की ७ एप्रिल ते २० एप्रिल दरम्यान देशभरात सामाजिक न्याय पंधरवडा साजरा केला जाईल. सामाजिक न्याय पंधरवड्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना जिल्ह्या-जिल्ह्यापर्यंत आणि मंडळांपर्यंत नेण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार आहेत. १२ एप्रिल हा दिवस लसीकरण दिन म्हणून साजरा करणार आहोत. १३ एप्रिल रोजी देशभरात गरीब कल्याण अन्न योजनेशी संबंधित कार्यक्रम होणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी बूथ स्तरावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अरुण सिंह म्हणाले की, १५ एप्रिल रोजी अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी केलेले कार्य आणि त्यासोबतच समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या अनुसूचित जमाती समाजातील लोकांचा गौरव करण्याचे कामही भाजपचे कार्यकर्ते करणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -