घरदेश-विदेशकाँग्रेस नेत्यांवर रविशंकर प्रसादांचा निशाणा!

काँग्रेस नेत्यांवर रविशंकर प्रसादांचा निशाणा!

Subscribe

'काँग्रेस पक्षाचा भारतीय वायुसेनेवर विश्वास नाही', असा थेट आरोपही रविशंकर प्रसाद यांनी यावेळी केला.

केंद्रीय मंत्री रविकंशर प्रसाद यांनी ‘एअर स्ट्राईक’वर प्रश्न उपस्थित करत काँग्रेसच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. सरकारची बाजू मांडण्यासाठी आलेल्या प्रसाद यांनी कपिल सिब्बल, पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंह आदी काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यांवर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधताना प्रसाद म्हणाले, की ‘काँग्रेसमधील नेत्यांच्या या वक्तव्यांमुळे खूप त्रास झाला. एअर स्ट्राईकबाबत त्यांनी केलेली वक्तव्यं खूपच खेदजनक आहेत’. दुसरीकडे काँग्रेस नेत्यांच्या इंग्रजी उच्चारणाविषयी बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले, की ‘इंग्रजींच्या या विद्वानांना देशाच्या लष्करावर भरोसा नाही. मात्र, बोलायची सर्वांनाच हौस आहे.’.

काँग्रेसचा वायुसेनेवर विश्वास नाही

‘दिग्विजय सिंह यांचा बोलण्याचा स्तर घसरला आहे’ अशी टीका करत प्रसाद म्हणाले, की ‘सिंह १० वर्ष मुख्यमंत्री पदावर होते. मात्र, आज ते अशाप्रकारचे शब्द प्रयोग करत आहेत जे ऐकल्यावर कुणालाही त्रासच होईल. सिंह यांनी पुलवामा हल्ल्याची तुलना दुर्घटनेशी केली. त्यांचा स्तर इतका पडला आहे की एका दहशतवादी हल्ल्याला ते केवळ एक दुर्घटना म्हणत आहेत.’ ‘काँग्रेस पक्षाचा भारतीय वायुसेनेवर विश्वास नाही’, असा थेट आरोपही प्रसाद यांनी यावेळी केला.

- Advertisement -

काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना टोला हाणत रविशंकर प्रसाद म्हणाले, की ‘चिदंबरम १० वर्ष केंद्रात कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. इंग्रजी भाषेचे विद्वान आणि वकील असलेले चिदंबरम सध्या खासगी समस्यांमुळे त्रासलेले आहेत. ते वारंवार परदेशी मीडियाचा उल्लेख करतात. मग मी यांना विचारु इच्छितो की यांना देशाच्या वायुसेनेवर विश्वास नाहीये का?’

- Advertisement -

यांना पुरावे हवेत…

कपिल सिब्बल यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवत प्रसाद म्हणाले, की ‘सिब्बल हे काँग्रेसचे आणखी एक दिग्गज नेते आहेत. परदेशात बसून भारतातील निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांकडे हे दिग्गज त्यांच्या बोलण्याचा पुरावा मागत नाहीत. मात्र, आपल्याच देशातील सैन्याच्या शौर्याविषयी शंका उपस्थित करतात. त्यांच्या शौर्याचे पुरावे मागतात.’ ‘काँग्रेसच्या एवढ्या अनुभवी नेत्यांनी अशाप्रकारची वक्तव्यं करणं ही खरोखरंच खेदजनक बाब आहे’, असं मत सिब्बला यांनी यावेळी व्यक्त केलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -