घरताज्या घडामोडीकोरोना संपत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही - भाजपच्या मंत्र्याची ...

कोरोना संपत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नाही – भाजपच्या मंत्र्याची प्रतिज्ञा

Subscribe

माझ्या तपश्चार्येमुळे उत्तर प्रदेशमधील कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात यश

कोरोना प्रादुर्भावाने देशातील परिस्थिती भयावह झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. यामध्ये एका मंत्र्याने कोरोना संपत नाह तोपर्यंत अन्नाचा कणही घेणार नसल्याचे म्हटलं आहे. एवढंटच नाही तर हे मंत्री मागील ५ वर्षांपासून भोजनच करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव संपण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली असल्याचा दावा केला आहे. आपल्या या वक्तव्यामुळे हे भाजपचे मंत्री चांगलेच चर्चेत आले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी कोरोना संपत नाही तोपर्यंत एकही अन्नचा कण घेणार नसल्याची प्रतिज्ञा घेतली आहे. देशात कोरोना प्रादुर्भावाने हाहाकार घातला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापुर्वी दहशतवादाचा नाश करण्यासाठी आपण अन्न घेणार नसल्याचे वचन दिलं होते. यामुळे आता देशात दहशतवाद संपण्याच्या मार्गावर असल्याचे मंत्री महेश गुप्ता यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

कोरोना नावाचा शत्रू या भारतातून आणि जगापासून समूळ नष्ट होईपर्यंत मी अन्नाचा कणही घेणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा घेतली असल्याचे महेश गुप्ता यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपाययोजना करुन थोपवले आहे. परंतु आता तज्ञ तिसऱ्या लाटेच्याबाबतीत इशारा देत आहेत. यामुळे तिसरी लाट भारतात आणि उत्तर प्रदेशमध्ये येऊ नये यासाठी मी प्रतिज्ञा केली आहे. असा दावा मंत्री महेश गुप्ता यांनी केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट माझ्यामुळे टळली

उत्तर प्रदेशचे नगरविकास मंत्री महेश गुप्ता यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु माझ्या तपश्चार्येमुळे उत्तर प्रदेशमधील कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात यश आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार तयार असून राज्यात लहान मुलांना स्वतंत्र वॉर्ड वगैरे तयार केले आहेत. तसेच तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सगळं यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे

- Advertisement -

नरेंद्र मोदी जगाचे नायक

मंत्री हेमंत गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगाचा नायक म्हणून संबोधले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलला जीवनदान दिले आहे. यामुळे अमेरिकेला पंतप्रधान मोदी यांच्या कोरोनावरील धोरणांवर विश्वास आहे. कोरोनाची दुसरी लाट हाताळताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाली असताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनावरील उपाययोजनांवर काम केले आणि लोकांचे जीव वाचवले आहेत.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -