घरदेश-विदेशभाजपने दहा जागा जिंकल्यास ट्विटर सोडून देईन - प्रशांत किशोर

भाजपने दहा जागा जिंकल्यास ट्विटर सोडून देईन – प्रशांत किशोर

Subscribe

माझे हे ट्विट सेव्ह करून ठेवा भाजपने जर दहा जागा मिळवल्या तर मी ट्विटर सोडून देईन असेही त्यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकांचे वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टी आपल्या नेतृत्वाने बंगालवर आपली सत्ता स्थापन करण्याच्या मिशनवर आहे. भाजपसाठी मिशन बंगाल हे खूप महत्त्वाचे आहे. या सगळ्यात तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि ममता बॅनर्जी यांचे राजकिय सल्लागार प्रशांत किशोर यांनी बीजेपीवर हल्ला बोल केला आहे. भारतीय जनता पार्टी या निवडणूकीत दहाचा आकडा पार करू शकणार नाही असे ट्विट त्यांनी केले आहे.

प्रशांत किशोर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, ‘मीडियाचा एक भाग भाजपच्या समर्थनार्थ एक वेगळा माहोल तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एकीकडे भाजप निवडणूकीत दहाचा आकडा पार करण्यासाठी संघर्ष करत आहेत. जर बंगालमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली तर मी ही जागा सोडून देईन’, असे त्यांनी म्हटले आहे. ‘माझे हे ट्विट सेव्ह करून ठेवा भाजपने जर दहा जागा मिळवल्या तर मी ट्विटर सोडून देईन’, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रशांत किशोर यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यांनी असे लिहिले आहे की, भाजपने जर दहाचा आकडा पार केला तर ते ही जागा सोडून जातील. त्यांनी असे स्पष्ट केले नाही की ते ट्विटर सोडणार की राजकीय पद. प्रशांत किशोरच्या या ट्विटने भापजावर हल्ला बोल केला आहे. प्रशांत किशोर यांच्या ट्विटनंतर भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनीही ट्विट केले आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, बंगालमध्ये भाजपची जी त्सुनामी चालू आहे, सरकार तयार झाल्यानंतर देशाला निवडणूक रणनीतिकार गमवावा लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

प्रशांत किशोर हे आधी जेडीयूचे नीतीश कुमार यांचे राजकिय सल्लागार होते. परंतु गेल्या वर्षी काही मतभेद झाल्याने त्यांनी जेडीयू सोडून टीएमसीमध्ये गेले. ममता बॅनर्जीनी पश्चिम बंगालच्या निवडणूका जिंकण्यासाठी प्रशांत किशोर यांच्यासोबत अग्रीमेंट साइन केले आहे. त्यानंतर ते भाजपवर उघडपणे राजकिय भाष्य करताना दिसून येत आहेत.


हेही वाचा – नेहा सिंहने इतिहास रचला; पहिल्यांदाच ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये बलिया जिल्ह्याच्या नावाची नोंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -