घरताज्या घडामोडीगुजरातमध्ये भाजपाच्या मिशन इलेक्शनला सुरुवात, CNG-PNGच्या दरात कपात

गुजरातमध्ये भाजपाच्या मिशन इलेक्शनला सुरुवात, CNG-PNGच्या दरात कपात

Subscribe

गुजरातमध्ये वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी गुजरात सरकारने इंधनाच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे. CNG आणि PNGच्या दरात १० टक्के व्हॅट कमी करण्याचा निर्णय भूपेंद्र पटेल सरकारने घेतला आहे. सरकारचा या निर्णयाचा फायदा १४ लाख सीएनजी वाहन चालकांना होणार आहे.

भाजपा सरकारने जनतेला खूश करण्यासाठी यापूर्वी देखील अशाच प्रकारचे निर्णय घेतले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून गुजरातमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- मुख्यमंत्री अमृतम आयुष्मान कार्डचे वितरण देखील सुरू करणार असल्याची माहिती पीएमओने दिली.

- Advertisement -

या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेससोबतच आप सुद्धा जोरदारपणे लढणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते सर्व पक्षाचे नेते सातत्याने गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजप आणि आपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.


हेही वाचा : आमची भूमिका लोकमान्य झाली.., ग्रामपंचायत निवडणुकांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -