घरदेश-विदेशउत्तर प्रदेशमध्ये भाविकांनी भरलेली बोट उलटली, 30 जण बुडाले; तिघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये भाविकांनी भरलेली बोट उलटली, 30 जण बुडाले; तिघांचा मृत्यू

Subscribe

सर्व लोक बोटीवरून कुस्ती पाहण्यासाठी जात होते, त्यादरम्यान बोटीचा तोल सुटल्याने ती उलटली आणि मोठी दुर्घटना घडली. सध्या प्रशासनाचे पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहे

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकीमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. सुमली नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटली, त्यामुळे 30 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर 7 जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 20 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

सर्व लोक बोटीवरून कुस्ती पाहण्यासाठी जात होते, त्यादरम्यान बोटीचा तोल बिघडल्याने ती उलटली आणि मोठी दुर्घटना घडली. सध्या प्रशासनाचे पथक घटनास्थळी बचावकार्य करत आहे. डीएम, एसपी आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमली नदीच्या पलीकडे मोहम्मदपूर खला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैराणा माळ माझरी गावात जत्रा आणि कुस्ती सुरू होती. ते पाहण्यासाठी लोक जात होते, त्याच दरम्यान हा अपघात झाला.

- Advertisement -


दरवर्षी कार्तिक पौर्णिमेनिमित्त बैराणा माळ माझरी गावातील गगरण देवाच्या ठिकाणी जत्रा भरते. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावेळीही लोक जत्रा पाहण्यासाठी छोट्या होडीतून जात होते. त्यानंतर मोहम्मद पूर खला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैराणा माळ माझरी गावात गावकऱ्यांनी भरलेली असंतुलित बोट सुमली नदीत उलटली. या बोटीमध्ये 30 लोक होते, ज्यामध्ये 2 मुलांसह 3 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मदतीच्या सूचना दिल्या आहेत.


हेही वाचाः राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला नांदेडमधून सुरुवात; जाणून घ्या यात्रेतील घडामोडी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -