घरCORONA UPDATEVideo: बॉलीवूड कलाकारांचा नारा; 'फिर मुस्कुराएगा इंडिया...'!

Video: बॉलीवूड कलाकारांचा नारा; ‘फिर मुस्कुराएगा इंडिया…’!

Subscribe

बॉलीवूडच्या कलाकारांचा भारतातील नागरिकांना मोटिव्हेट करणारा, 'फिर मुस्कुराएगा इंडिया... फिर जीत जाएगा इंडिया...', हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. जगासह देशातही त्यामुळे चिंतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार, डॉक्टर्स, पोलीस, अत्यावश्यक सेवा आपापल्या परीने सर्व पर्यंत करत आहेत. तर नेहमीच लोकांचे मनोरंजन करणारे आपले लाडके कलाकार हे देखील अशा कठिण परिस्थितीत लोकांचे मनोबल वाढवण्यात हातभार लावत आहेत. बॉलीवूडच्या कलाकारांचा भारतातील नागरिकांना मोटिव्हेट करणारा, फिर मुस्कुराएगा इंडिया… फिर जीत जाएगा इंडिया…, हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून यामध्ये बॉलीवूडचे अनेक कलाकार आपल्याला पाहालया मिळत आहेत. अक्षय कुमार, विकी कौशल, राजकुमार राव, टाइगर श्रॉफ, कृति सैनन, भूमी पेडणेकर, अन्यना पांडे, आयुषमान खुराना, तापसी पन्नू, जय भानुशाली सारखे बॉलीवूडचे कलाकार फिर मुस्कुराएगा इंडिया… हा नारा देताना या गाण्यात दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या गाण्याचे कौतुक केले असून सिनेसृष्टीतील चांगला पुढाकार असल्याचे त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे.

- Advertisement -

सिनेकलाकारांची शॉर्ट फिल्मही प्रदर्शित 

तसेच भारतीय फिल्म उद्योग जगतातील सर्व दिग्गज कलाकारांनी मिळून फॅमिली या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून या परिस्थितीत घरामध्ये राहण किती आवश्यक आहे,  हे सांगणारा एक व्हिडिओ जारी केला आहे. बॉलीवूडपासून मराठी, दाक्षिणात्य, पंजाबी, बंगाली अशा सर्व भाषेतील कलाकारांनी या शॉर्ट फिल्ममध्ये सहभाग दर्शवला आहे. इतकेच नव्हे तर लॉकडाऊनमुळे सिने जगतातील सर्व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी, रोजंदारीवर काम करणारे, स्पॉटबॉय यांच्याकरता आर्थिक निधीदेखील उपलब्ध करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे या कलाकारांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -