घरताज्या घडामोडीCoronavirus - तरूणाने क्वारंटाईन सेंटरमध्ये केली आत्महत्या!

Coronavirus – तरूणाने क्वारंटाईन सेंटरमध्ये केली आत्महत्या!

Subscribe

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी क्वारंटाईन सेंटर आणि आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. कोरोना संशयितांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. याच मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात एका क्वारंटाईन सेंटरमध्ये एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र अद्याप आतम्हत्येच कारण समजलेले नाही. सांगितलं जातय की, एक दिवस आधी त्याचे वडिल त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये भेटायला आले होते.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अमानगंज पोलिस क्षेत्रात शासकीय महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटर बनवण्यात आले होते. या सेंटरमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना थांबवण्यात आले होते. यात सागर जिल्ह्याच्या गढाकोटा येथील १०० किलोमीटर पायी चालत आलेले सहा लोकांना ठेवण्यात आले होते. यात रामलखन कुशवाह देखील होता. त्यालाही याच क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. मंगळवारी दुपारी क्वारंटाईन सेंटरच्या एका खोलीत खिडकीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

- Advertisement -

अमानगंजचे प्रभारी राजेश तिवारी यांनी सांगितले की, रामलखन हा क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला सोमवारी आणि मंगळवारी त्याचे वडिल त्याला भेटायला आले, त्यांनी एकत्र जेवणही केलं. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. सध्या तपासणी सुरू आहे.

मध्यप्रदेशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. २३०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १२० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मध्यप्रदेशात मोठ्या शहरांबरोबर लहान शहरातही कोरोना पसरत चालला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. राज्यात कोरोना जास्त मालवा आणि निमाड जिल्ह्यात आहे. मध्यप्रदेशातील इंदौरमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत. इंदौरमध्ये ६३ लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘बालकलाकार ते लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’, असा होता ऋषी कपूर यांचा प्रवास!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -