लग्नाचा भुर्दंड; नवरा-नवरीसकट ४१ वऱ्हाडी कोरोना पॉझिटिव्ह!

Daughter in law is killed for dowry in pune
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आलेली असताना लग्न-समारंभांना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. काही मोजक्याच लोकांना लग्न समारंभांना उपस्थित राहण्याची मुभा असताना एका लग्न (Marriage) समारंभात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा भुर्दंड नवरा-नवरीसकट तब्बल ४१ वऱ्हाडी मंडळींना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन सतर्क झाले असून या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच, साथरोग प्रसार प्रतिबंध कायद्यानुसार पोलिसांना गुन्हा देखील दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार २ वर्षांची कैद किंवा १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा असू शकणार आहे.

हा प्रकार घडलाय केरळच्या कासारगोडा जिल्ह्यातल्या चेंगला पंचायतीच्या कार्यकक्षेमध्ये. १७ जुलै रोजी इथल्या एका घरामध्ये लग्न आयोजित करण्यात आलं होतं. या लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा नक्की आकडा सांगता येत नसला, तरी ५० हून जास्तच रुग्ण उपस्थित असल्याचा अंदाज आहे. या लग्नात उपस्थित असलेल्या वऱ्हाडी मंडळींपैकी ४१ लोकांसोबतच खुद्द नवरा-नवरी देखील कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर जे जे या लग्नाला उपस्थित होते, त्या सगळ्यांना क्वारंटाईन होण्याचे आदेश कासारगोडा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पॉझिटिव्ह झालेल्या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार या कार्यक्रमाला ५० हून जास्त लोकांनी उपस्थिती लावली होती. मात्र, निर्बंधांमुळे एकाच वेळी ५० हून जास्त लोकं त्या ठिकाणी हजर असण्याची शक्यता कमी आहे. शिवाय, नक्की कुणाकडून संसर्ग सुरू झाला, याची अद्याप माहिती मिळू शकलेली नसली, तरी संसर्ग (Virus Infection) झालेले सर्व रुग्ण हे लग्नघरातले नातेवाईकच आहेत.