घरताज्या घडामोडीबृजभूषण सिंह शहाणे राजकारणी, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत - संजय...

बृजभूषण सिंह शहाणे राजकारणी, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत – संजय राऊत

Subscribe

भाजप खासदार बृजभूषण सिंह हे एक शहाणे राजकारणी आहेत. ते मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उगाच विरोध करणार नाहीत, अंस राऊत यांनी म्हटलं आहे. ते बुधवारी अयोध्येत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला (Ayodhya Visit) भाजपचे खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी कठोर विरोध केला होता. मात्र, आता त्याबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अप्रत्यक्षपणे बृजभूषण सिंह यांना समर्थन दिलं आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह हे एक शहाणे राजकारणी आहेत. ते मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या दौऱ्याला उगाच विरोध करणार नाहीत, अंस राऊत यांनी म्हटलं आहे. ते बुधवारी अयोध्येत प्रसार माध्यमांशी बोलत होते. दरम्यान, संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे. (BrijBhushan Singh Is Wise Politician He Never Oppose Mns Chief Raj Thackeray Ayodhya Visit Without Reason Says Sanjay Raut)

हेही वाचा – “फक्त शिवसेनेचंच हिंदुत्व असली!”, दिपाली सय्यद अयोध्येत गरजल्या

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण प्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा घोषित केला होता. ५ जून रोजी ते अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. यासंदर्भात पुण्यातील पत्रकार परिषदेत ठाकरेंनी स्वतःहून माहिती दिली होती. मात्र, भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या या दौऱ्यावर कडाडून विरोध केला. उत्तर प्रदेशवासियांची माफी मागत नाही तोवर राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशात पाय ठेवू देणार नाही, अशी धमकी बृजभूषण सिंह यांनी दिली होती. तसेच, त्यांच्या कार्यकर्त्यांना शरयू नदीत बुडवू अशीही धमकी दिली होती. दरम्यान, राज ठाकरे यांनी ५ जूनचा अयोध्या दौरा शस्त्रक्रियेसाठी रद्द केला. मात्र, बृजभूषण सिंह यांच्या धमकीला घाबरूनच त्यांनी हा दौरा रद्द केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.

आज, १५ जून रोजी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला पोहोचले आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊतही उपस्थित आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी बृजभूषण सिंह यांची बाजू घेत त्यांचे समर्थन केले.

- Advertisement -

बृजभूषण सिंह हे शहाणे राजकारणी आहेत. त्यांना मी गेली अनेक वर्षे ओळखतो. ते कधीही विरोधासाठी विरोध करत नाहीत. बृजभूषण सिंह हे कुस्तीक्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरचं नाव आहे. त्यामुळे बृजभूषण सिंह हे राज ठाकरे यांना विरोध करत असतील तर त्यामागे त्यांच्या राज्याच्या काही समस्या असतील, असं म्हणत त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना डिवचलं आहे.

हेही वाचा – अयोध्येत दर्शन घ्यायला आलोय, इथे कुठलाही राजकीय विषय नाही : आदित्य ठाकरे

पुढे संजय राऊत म्हणाले की, शिवसेना अनेक वर्षांपासून अयोध्येत येत आहे. अयोध्येतील स्थानिक नेत्यांचे शिवसेनेसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बृजभूषण सिंहदेखील त्यापैकी एक आहेत. मी त्यांनी काही आज ओळखत नाही. त्यांना गेली ३४-२५ वर्षांपासून ओळखत आहे. आम्ही फोनवरूनही नेहमी चर्चा करतो. त्यामुळे त्यांचा राज ठाकरे यांच्या दौऱ्याला का विरोध आहे, हे माहिती नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -