घरदेश-विदेशसमलैंगिक संबध साधल्यास दगडाने ठेचून मृत्यूची शिक्षा मिळणार

समलैंगिक संबध साधल्यास दगडाने ठेचून मृत्यूची शिक्षा मिळणार

Subscribe

मुस्लिम शर्यत कायद्याअंतर्गत समलैंगिक संबध ठेवल्यास आता मृत्यूची शिक्षा मिळणार आहे. दगडाने ठेचून त्यांची हत्या केली जाणार आहे.

इस्लाम शरिया कायद्यात काही बदल करण्यात आले आहे. या बदला नुसार समलैंगिक संबध ठेवणाऱ्यांना मृत्यूची शिक्षा देण्यात येणार आहे. या निर्णयाचा एलजीबीटी समूदाने विरोध केला आहे. इस्लाम शरिया कायदा हा बळगट करण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये ३ एप्रिलपासून हा कायदा लागू करण्यात येणार आहे. ब्रुनेई या देशात हा कायदा लागू करण्यात येण्यात आहे. अनेक हॉलिवूड कलाकारांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. ब्रुनेई या देशाने २०१३ मध्ये इस्लाम धर्म आत्मसात केला होता. इस्लाम धर्माला राष्ट्रीय धर्माचा मान देण्यात आला आहे. या धर्मानुसार शरिया कायदा या देशाने स्विकारला आहे.

इस्लामधर्म स्विकारल्यामुळे कायदे कडक

इस्लाम धर्माअंतर्गत ब्रुनेई देशात मद्यावरही बंदी घालण्यात आली आहे. याच बरोबर नाताळ साजरी करणे या देशात बंदी आहे. या देशात अनेक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. कायद्यामध्ये कठोरता असल्याने येथे कायदे तोडल्यास कडक शिक्षा देण्यात येते. या पूर्वी इंडोनेशियामध्ये विवाहपूर्वी शरीर संबध ठेवणाऱ्या प्रेमी युगुलांना फटक्याची शिक्षा देण्यात आली होती. या ठिकाणी कडक शिक्षा असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -