घरताज्या घडामोडीBudget 2021: यंदा खासदार मारणार ५ स्टार हॉटेलच्या जेवणावर ताव; ५२ वर्षांची...

Budget 2021: यंदा खासदार मारणार ५ स्टार हॉटेलच्या जेवणावर ताव; ५२ वर्षांची परंपरा मोडीत

Subscribe

संसदेतील खासदारांना मिळणार फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण.

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. देशाचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. दरम्यान, यंदा संसदेत एक मोठा ऐतिहासिक बदल होणार असून हा बदल भोजनाबाबत आहे. यंदा खासदार संसद भवन संकुलाच्या कॅन्टीनमधील जेवणाचा आस्वाद घेणार नाही. तर चक्क फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणार ताव मारणार आहेत. गेल्या ५२ वर्षांपासून अर्थसंकल्पाच्या वेळी उत्तर रेल्वेकडून संसदेच्या खासदारांची जेवणाची सोय केली जायची. मात्र, यंदा ही परंपरा मोडीत काढण्यात आली आहे.

५ स्टार हॉटेलमधील शेफ बनवणार जेवण

मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात यंदा भारत पर्यटन विकास महामंडळातर्फे खासदारांची भोजनाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे जेवण अशोक हॉटेलच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधील शेफ तयार करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे खासदारांना देण्यात येणार फाईव्ह स्टार हॉटेलमधील जेवण अगदी स्वस्त असणार आहे कारण त्यांना फाईव्ह स्टारच्या किंमती आकारल्या जाणार नाहीत. त्यामुळे आता संसदेच्या कॅन्टीनमध्ये स्वस्तात फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाचा खासदारांना आनंद घेता येणार आहे.

- Advertisement -

काय मिळणार थाळीत?

संसदेत देण्यात येणारी फाईव्ह स्टार थाळीची किंमत फक्त १०० रुपये असणार आहे. यामध्ये कढाई पनीर, मिक्स वेज ड्राई, भाजी, दाल सुल्तानी, मटर पुलाव, चपाती, ग्रीन सॅलड, काकडी-पुदीना कोशिंबीर, पापड आणि गुलाबजाम याचा समावेश असणार आहे. तर मिनी थाळी केवळ ५० रुपये असणार आहे. यामध्ये मिक्स वेड ड्राई, भाजी, दाल सुल्तानी, जिरा पुलाव, चपाती, ग्रीन सॅलड, काकडी-पुदीना कोशिंबीर आणि पापड याचा समावेश असणार आहे.

नाश्ता काय मिळणार?

जेवणाशिवाय संसदेत नाश्ता देखील दिला जाणार आहे. यामध्ये १३ पदार्थांचा समावेश असणार आहे. त्यात नाश्त्याचे सात प्रकार सोडले तर इतर शाकाहारी भोजनाचा समावेश असणार आहे. यामध्ये देखील छोटी आणि मोठी अशा दोन थाळ्यांचा समावेश असणार असून २५ रुपयात उपमा तर ५० रुपयात पनीर पकोडा, १० रुपयात समोसा किंवा कचोरी या पदार्थांचा समावेश असणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शेतकरी, पोलिसांमध्ये पुन्हा धुमश्चक्री


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -