ICMRचे संचालक डॉ.बलराम भार्गव यांनी दिले स्पष्टीकरण

कोरोनाला आळा घालण्यासाठी देशभरत लसीकरण मोहीम राबवली जात आहे. दरम्यान कोरोना विरोधात बुस्टर व्हॅक्सिन डोसची गरज असल्याचा आतापर्यंत कोणताही वैज्ञानिक द्दष्टिकोनातील पुरावा नाही असे आयसीएमआरचे महासंचालक डॉ.बलराम भार्ग यांनी स्पष्ट केलं आहे.तसेच बुस्टर डोसबाबत काही दिवसात नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायजेशन इन इंडिया (NTAGI) च्या बैठकीत या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.