घरदेश-विदेशशाही चोरी: हैदराबाच्या निजामाचा 'golden टिफीन' चोरीला

शाही चोरी: हैदराबाच्या निजामाचा ‘golden टिफीन’ चोरीला

Subscribe

आंतराष्ट्रीय बाजारपेठेत ५० कोटी इतकी किंमत असलेले, हैदराबादी निझामांचे Golden टिफिन आणि हिरेजडित कप चोरीला गेले आहेत.

हैदराबाद शहरातील पुरानी हवेली परिसरात असलेल्या निजाम संग्रहालयामधून, निजामांचा सोन्याचा टिफीन आणि हिरेजडित कप चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. समोर आलेल्या माहितीनुसार चोरीला गेलेल्या पुरातत्विक विभागातील या सर्व वस्तू मिर उस्मान अली खान (सातवे निजाम) यांच्या होत्या. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी झालेल्या गोल्डन टिफीनमध्ये हिरे आणि मोती जडले होते. दरम्यान चोरी झालेल्या वस्तूंचे आंतराष्ट्रीय बाजारातील मूल्य ५० कोटी रुपये असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या ‘रॉयल टिफीन’चं वजन अंदाजे २ किलो इतकं होतं. अशाचप्रकारच्या सुमारे ४५० शाही वस्तू या निझाम संग्रहालयामध्ये ठेवलेल्या आहेत. यापैकी काही वस्तू मिर महबूब अली खान (सहावे निजाम) यांच्यादेखील आहेत.

अशी झाली चोरी…

हैदराबाद पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर ही ‘शाही चोरी’ कशी झाली असावी? याविषयीची शक्यता समोर आली आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, संग्राहलयातील भिंतीवर लावण्यात आलेल्या लाकडी व्हेंटिलेशनमधून चोर दोरीच्या मदतीने चौथ्या मजल्यावर जाऊन पोहोचले. रविवार असल्यामुळे निजाम म्युझिअम बंद होते. त्यामुळे चोर सहजतेने आतमध्ये शिरकाव करु शकले. सोमवारी ज्यावेळी व्यवस्थापक आणि कर्मचारी संग्रहालयात आले त्यावेळी त्यांना चौथ्या मजल्यावरील काही वस्तू गायब झाल्याचे दिसले. दरम्यान या शाही चोरीचा पुढील तपास करण्यासाठी तसंच चोरीला गेलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १० अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमल्याचे समजत आहे. शिवाय CCTV च्या फुटेजद्वारेही या घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -