घरदेश-विदेशआयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी. चिदंबरम यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

Subscribe

आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पी. चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रात आणखी १४ जणांच्या नावाचा समावेश आहे. येत्या सोमवारी, २१ ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी होणार आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात पी. चिदंबरम यांच्यासह त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम, पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यासह १४ जणांच्या नावाचा यात समावेश आहे. यांपैकी पी. चिदंबरम याच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून त्यांची रवानगी दिल्लीच्या तिहार तुरुंगात करण्यात आली आहे.

- Advertisement -

गुरुवारी कोर्टाने चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील चिदंबरम यांना तुरुंगातच अटक करुन चौकशी केली होती. २१ ऑगस्ट रोजी त्यांना अटक झाल्यानंतर जवळपास दोन महिने ते सीबीआय आणि न्यायालयीन कोठडीत आहेत. पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांची देखील या आरोपपत्रात नावे आहेत. माजी पती-पत्नी असलेले हे दोघे सध्या मुंबईच्या ऑर्थरोड आणि भायखाळा तुरुंगात आहेत. शीना बोरा हायप्रोफाईल हत्याकांड प्रकरणात सीबीआय कोर्टात त्यांच्यावर खटला सुरु आहे. इंद्राणी मुखर्जी आयएनएक्स मीडियाची संचालक होती. त्यामुळे दोघांवर या कथीत भ्रष्टाचार प्रकरणाला मंजूरी दिल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण

मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी तिहार जेलमध्ये असलेले माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) ने चौकशी करुन त्यांना अटक केली. तिहार जेलमध्येच ही चौकशी करण्यात आली. जवळपास एक तास ही चौकशी सुरु होती. मंगळवारी विशेष न्यायालयाने ईडीला पी. चिदंबरम यांची चौकशी तसेच अटकेची परवानगी दिली होती. दरम्यान चिदंबरम यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी जामीन याचिका दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -