घरदेश-विदेशUttarakhand Glacier Burst: १० मृतदेह सापडले तर १०० हून अधिक जण बेपत्ता;...

Uttarakhand Glacier Burst: १० मृतदेह सापडले तर १०० हून अधिक जण बेपत्ता; अद्याप बचावकार्य सुरू

Subscribe

उत्तरखंडमधील जोशीमठ तालुक्यात अत्यंत दुर्देवी घटना घडली असून जोशीमठात हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील चामोली येथील पूरस्थितीमुळे आतापर्यंत १० मृतदेह सापडले आहेत तर १०० हून अधिक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

उत्तराखंडमधील आपत्तीनंतर चामोली ते हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगेच्या किनारपट्टी व उपनद्यांच्या किनाऱ्यावरील रस्ते बंद करण्यात आले आहेत. गंगेच्या काठावरील सर्व कॅम्प रिकामी केली जात आहेत. जोशीमठ आणि तपोवनमधील घरे रिकामी केली जात आहेत. उत्तराखंड येथील चमोली जिल्ह्यातील ऋषिगंगा नदीवरील राणी गावात असणाऱ्या २४ मेगावॅट जलविद्युत प्रकल्पातील बंधारा रविवारी सकाळी हिमस्खलनानंतर फुटला. पाण्याचा जोरदार प्रवाह धौलीगंगेकडे सरकल्याने दहा किलोमीटर अंतरावर तपोवन येथे धौलीगंगा नदीवर निर्माणाधीन ५२० मेगावॅट वीज प्रकल्पातील दुसरा बंधारासुद्धा फुटला होता.

धरण फुटल्याने धौलीगंगेच्या पाणीपातळी वाढ

आज सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हा हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. दरम्यान या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले आणि यापाण्यात कित्येक घरांचे नुकसान झाले तर अनेक माणसेही या प्रवाहात वाहून गेली आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीवरील ऋषी गंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठं नुकसान झाले आहे. धरण फुटल्याने धौलीगंगेच्या पाणीपातळी प्रचंड वाढ झाली आहे. अचानक पूर आल्याने नदीकाठावरील घराचं तडाखा बसला असून, अनेकजण बेपत्ता असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

पोलिसांकडून हेल्पलाईन जारी

व्हॉट्सअॅप नंबर 9458322120.
FaceBook chamoli police.
Twitter @chamolipolice @SP_chamoli.
Instagram chamoli_police


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -