घरताज्या घडामोडीअयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचा असाही सहभाग, गर्भगृहापासून मुख्यप्रवेशद्वारासाठी 'या' भागातून जाणार सागवान लाकूड

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचा असाही सहभाग, गर्भगृहापासून मुख्यप्रवेशद्वारासाठी ‘या’ भागातून जाणार सागवान लाकूड

Subscribe

अयोध्येतील मंदिरासाठी लागणारे 1 हजार 800 क्यूबिक मीटर लाकूड महाराष्ट्रातून जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान मंदिराच्या निर्मीतीसाठी वापरण्यात येणार आहे.

रामजन्मभूमी अयोध्या येथे भव्य राम मंदिर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. रामलला मंदिरात विराजमान होण्याची रामभक्त मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रभू श्रीराम यांची मूर्ती बनवण्यासाठी नेपाळच्या नदीतून शालीमार दगड नेण्यात आले. त्यानंतर आता राम मंदिराच्या उभारणीत महाराष्ट्राचेदेखील योगदान असणार आहे. मंदिरासाठी लागणारे 1 हजार 800 क्यूबिक मीटर लाकूड महाराष्ट्रातून जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दर्जेदार सागवान मंदिराच्या निर्मीतीसाठी वापरण्यात येणार आहे. 29 मार्चला भव्य शोभायात्रेसह लाकडाची पहिली खेप अयोध्येला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात सापडणारे सागवान लाकून हे देशात सर्वोत्तम लाकूड आहे. या सागवान काष्ठचा अयोध्येत निर्माणादीन श्रीराम मंदिरासाठी उपयोग करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बल्लारशहा डेपोतून सागवानचे हे लाकून बुधवारी 29 मार्चला विधीवत पूजा करुन शोभायात्रेद्वारे अयोध्येकडे रवाना होणार आहे. सागवान काष्ठाचा पुरवठा केल्याबद्दल श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वने,सांस्कृतिक कार्यमंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

चंद्रपूरचे सागवान सर्वोत्कृष्ट

श्रीराममंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे. निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील देहरादून येथे असलेल्या फाॅरेस्ट रिसर्च इस्टिट्यूटशी संपर्क साधला असता, त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्त्कृष्ट असल्याचे सांगितले. त्यामुळे चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांचे ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन अॅण्ड टुब्रो टीसाईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाले आहे.

( हेही वाचा: आमची मतं परत द्या, नाहीतर तोच कांदा तुमच्या तोंडावर मारु; गुलाबराव पाटलांचा राऊतांवर पलटवार )

- Advertisement -

‘असा’ असेल कार्यक्रम

29 मार्च श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी लागणा-या सागवान लाकडाची पहिली खेप अयोध्येकडे रवाना होणार आहे. त्यानिमित्ताने बल्लारपूरच्या एफडीसीएमच्या डेपोतून माता महाकाली मंदिर, चंद्रपूर शहर मार्गे या सागवान लाकडाची भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे. तसेच, ठीकठिकाणी काष्टपूजन होणार आहे. दुपारी 3:30 वाजता फाॅरेस्ट एन्ट्री गेट, अलापल्ली रोड, बल्लारपूर येथून काष्ठ शोभायात्रेस सुरुवात होणार असून, संध्याकाळी 6 वाजता सर्वधर्मीय भव्य काष्ठपूजन सोहळा माता महाकाली मंदिर, चंद्रपूर येथे होणार आहे. तर रात्री 9 वाजता संगीतकार कैलास खेर यांचा रामगीतांचा कार्यक्रम चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -