घरदेश-विदेशस्वस्तात होतोय विमानाचा मस्त प्रवास

स्वस्तात होतोय विमानाचा मस्त प्रवास

Subscribe

केवळ 955 रुपयांत देशांतर्गत विमान प्रवास

आयुष्यात विमानाचा प्रवास हे अनेकांचे दिव्य स्वप्न ठरते. मात्र, वाढत्या स्पर्धेत प्रवाशांना आकर्षक करण्यासाठी काही खासगी विमान कंपन्या अगदी अल्प किंमतीत प्रवास उपलब्ध करून देत आहेत. परिणामी देशांतर्गत काही प्रमुख शहरांमध्ये अवघ्या ९५५ रुपयांमध्ये विमान प्रवास करता येणार आहे.

टाटा समूहातील कंपनी असलेल्या एअर एशिया इंडिया या कंपनीने पाच वर्षे सेवेत पूर्ण झाल्याने ही योजना सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जगातील कमी किंमतीत उत्कृष्ट सेवा देणारी एअरलाईन म्हणून एअर एशिया इंडियाची ओळख आहेत. एअर एशिया इंडिया या कंपनीने पाच वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हवाई प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याकरिता देशांतर्गत विमान प्रवास ९५५ रुपयांमध्ये देण्याची योजना आखली आहेत. सवलत देण्यात आलेल्या शहरांमध्ये देशभरातील बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोची, गोवा, पुणे व विशाखापट्टणम यांचा समावेश आहे. या शहरांमधील प्रवास हा अवघ्या ९५५ रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

- Advertisement -

ही सवलत फक्त १७ जून २०१९ रोजी सुरु होईल व १९ जून २०१९ रोजी संपेली आहेत. सेलअंतर्गत प्रवासाचा कालावधी १ नोव्हेंबर, २०१९ ते ८ सप्टेंबर २०२० आहेत. प्रत्येक भारतीयाला विमान प्रवासाचा आनंद मिळावा हा या मागचा हेतू आहे. तसेच, आमचे प्रवासी आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत आणि त्यांना सर्वोत्तम सेवा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एअर एशिया इंडिया एमडी सुनील भास्करन यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -