घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये काँग्रेसची वापसी; सीएमच्या रेसमध्ये आहेत हे दिग्गज

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची वापसी; सीएमच्या रेसमध्ये आहेत हे दिग्गज

Subscribe

२००३ नंतर काँग्रेस पुन्हा छत्तीसगडमध्ये आपला झेंडा फडकावणार आहेत. हे पाहता छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

छत्तीसगडमध्ये १५ वर्षानंतर काँग्रेस सत्ता स्थापन करणार आहे. छत्तीसगडमध्ये भाजपाला हादरा बसण्याची चिन्हे आहेत. कारण ९० जागा असलेल्या छत्तीसगडध्ये काँग्रेस ६६ तर भाजपा १५ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत एकाही जागेचा अंतिम निकाल आलेला नाही. पण काँग्रेसची विजयाकडे वाटचाल पाहता छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येईल अशी अशी चिन्ह आहेत. २००३ नंतर काँग्रेस पुन्हा छत्तीसगडमध्ये आपला झेंडा फडकावणार आहेत. हे पाहता छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून चार प्रमुख नावं समोर येत आहेत.

१. त्रिभुनेश्वर शरण सिंहदेव

छत्तीसगडमध्ये ‘टीएस बाबा’ च्या नावाने प्रसिध्द असलेल्या त्रिभुनेश्वर शरण सिंहदेव सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार आहेत. छत्तीसगडच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराच्या रुपात प्रसिध्दी मिळवणाऱ्या टीएस सिंहदेव सरगुजा यांच्या राज घराण्याशी त्यांचे संबंध आहेत. त्रिभुनेश्वर शरण सिंहदेव अंबिकापूर या जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. २०१३ च्या छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत टीएस सिंहदेव यांनी भाजपच्या अनुराग सिंहदेव यांना१३ हजार मतांनी हरवले होते. तर २००८ मध्ये ते १ हजार मतांनी विजयी झाले होते.

- Advertisement -

२. चरणदास महंत

काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि वरिष्ठ नेता चरणदास महंद या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात मैदानात उपतले आहेत. चरणदास यांना मुख्यमंत्री पदाचा प्रबल दावेदार मानला जात आहे. महंत यांच्याविरोधात भाजपचे मेघाराम साहू मैदानात आहेत. ज्या जागेवरुन ते निवडणुक लढवत आहे ती जागा २००८ मध्ये काँग्रेसकडे होती. तर २०१३ मध्ये भाजपने या जागेवर कब्जा केला होता.

३. भूपेश बघेल

भूपेश बघेल यांची छत्तीसगड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सूबेचे प्रबळ उमेदवाराच्या रुपामध्ये ओळख आहे. बघेल अनेक वादग्रस्त प्रकरणात आहेत. मागच्या वर्षी सेक्स सीडी प्रकरणानंतर बघेल अचानक वादामध्ये आले आणि त्यांना जेलमध्ये जावे लागले. सध्या काँग्रेसच्या विजयाच्या वाटचालीमध्ये वघेल यांचे देखील मोठे योगदान आहे. अशामध्ये ते सीएम पदाच्या रेसमध्ये देखील पुढे आहेत. बघेल पाटण सीटचे आमदार होते. यावेळी देखील ते निवडणुकीच्या मैदानात पुढे आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून मोतीलाल साहू उभे आहेत.

- Advertisement -

४. ताम्रध्वज साहू

छत्तीसगडमध्ये ताम्रध्वज साहू हे काँग्रेसचे एकटे खासदार आणि पार्टीचा ओबीसी चेहरा आहेत. काँग्रेसमध्ये परस्पर गटबाजीनंतर ऐन वेळी त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले. दरम्यान, साहू यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यामागे मुख्यमंत्री पदाचा तगडा उमेदवार देखील मानले जात आहे. त्यामुळे ताम्रध्वज साहू देखील मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत. सध्या दुर्ग ग्रामिणमधून ते विजयाकडे वाटचाल करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -