घरदेश-विदेशछत्तीसगडमध्ये १०० वर्षाच्या आजीचं मतदान

छत्तीसगडमध्ये १०० वर्षाच्या आजीचं मतदान

Subscribe

छत्तीसगडमधील पहिल्या टप्प्याच्या मतदानामध्ये १०० वर्षाच्या आजीनं देखील मतदानाचा हक्क बजावला आहे.

छत्तीसगडमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान होत आहे. नक्षलीदृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागामध्ये देखील मतदान होत असल्यानं सर्वांचं आजच्या मतदानाकडे लक्ष लागून राहिले आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या ९० जागा असून त्यापैकी १८ जागांवरती आज निवडणूक होत आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर, ११ डिंसेंबर रोजी निकाल हाती येणार आहेत. दरम्यान, छत्तीसगडमध्ये १०.३० वाजेपर्यंत १४ टक्के मतदान झालं आहे. आजच्या मतदानामध्ये लक्षणीय बाब म्हणजे दोरनपालमधील १०० वर्षाच्या आजीनं देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागामध्ये आजचं मतदान होतंय. त्यामुळे नक्षलवाद्यांची वक्रदृष्टी देखील आजच्या मतदानावरती आहे. मतदान करणाऱ्या आजी संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. मात्र या आजीचं नाव कळू शकलेलं नाही.

लोकसभेची सेमिफायनल

छत्तीसगडसोबत देशात ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशचा देखील समावेश आहे. दरम्यान, या राज्यांच्या निवडणुकीकडे लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल म्हणून पाहिलं जात आहे. छत्तीसगडमध्ये प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नक्षलवादाच्या मुद्याला हात घातला होता. यावेळी शहरी नक्षलवातदाच्या मुद्यााला हात घालत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर देखील हल्लाबोल चढवला होता. प्रचारामध्ये उडालेली धूळ पाहता छत्तीसगडमध्ये जनता कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहावं लागणार आहे.

- Advertisement -

दरम्यान छत्तीसगडमधील निवडणुकीला नक्षलवाद्यांनी विरोध केला आहे. रविवारी देखील नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये एक जवान शहीद झाला होता तर एक जण जखमी झाला होता. शिवाय,यापूर्वी झालेल्या हल्ल्यामध्ये दूरदर्शनच्या एका कॅमेरामनला देखील आपला जीव गमवावा लागला होता. परिमाणी, आजच्या मतदानाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

वाचा – आज छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -