Omicron Variant: ओमिक्रॉनमुळे चीनचे वाढले टेन्शन, कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच चीनमध्ये 5,280 रुग्णांची नोंद

चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कठोर पाऊल उचलली आहेत.

China reports 5,280 new Covid cases, the highest daily count since the start of the pandemic
Omicron Variant: ओमिक्रॉनमुळे चीनचे वाढले टेन्शन, कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा चीनमध्ये 5,280 रुग्णांची नोंद

जगभरात कोरोना परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक सुधारल्याचे दिसत आहे. सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. देशात देखील काही राज्यांमध्ये कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण यादरम्यान चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चीनमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच चीनमध्ये सर्वाधिक दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे. आज चीनमध्ये 5 हजार 280 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने ही दोन वर्षातील सर्वाधिक कोरोना संख्या असल्याचे म्हटले आहे. तसेच ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे सांगितले.

एएफपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, ‘कोरोना महामारीनंतर चीनमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत सर्वाधिक 5 हजार 280 रुग्णांची नोंद झाली आहे. चीनच्या जिलिन प्रांताला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 17 मिलियन लोकसंख्या असलेल्या शेन्झेनच्या टेकहसह १० प्रांतामध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.’

चीनमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कठोर पाऊल उचलली आहेत. शांघाईमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत, लोकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

वाढत्या कोरोनाच्या कहरामुळे जिलिन शहरात तात्पुरते रुग्णालय बनवण्यात आले आहेत. यामध्ये 6 हजार बेड्सची उपलब्धता आहे. १२ मार्चपर्यंत 3 तात्पुरते रुग्णालय पहिल्यापासून बनवण्यात आली आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या जात आहे. जिलिनमधील लोकांनी आतापर्यंत चाचण्यांच्या सहा फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. जिलिन व्यतिरिक्त सिपिंग आणि दुनहुआ पूर्णपणे लॉकडाऊन केले आहे.


हेही वाचा – हाँगकाँगमध्ये कोरोनाच्या ‘या’ व्हेरिएंटचे थैमान; मृतांचा पडला खच