घरदेश-विदेशचीनमधील २५० भारतीयांना लवकरच हलवणार!

चीनमधील २५० भारतीयांना लवकरच हलवणार!

Subscribe

चीनच्या वुहान शहरातून २५० भारतीयांना हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी घेतला आहे. करोना विषाणू झपाट्याने वाढत आहे आणि चीन हे करोना विषाणूचे केंद्र आहे. चीनसह इतर अनेक देशांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, कॅबिनेट सचिव राजीव गऊबा यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ही परिस्थिती हाताळण्याबाबत भारताच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी खबरदारीबाबतही अनेक निर्णय घेण्यात आले. चीनमधून प्रवासी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर,तसेच नेपाळच्या सीमेवरील एकात्मिक तपासणी नाक्यावर लोकांची तपासणी करण्याबरोबरच खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

- Advertisement -

चीनमध्ये करोना विषाणूच्या बळींची संख्या ८० वर पोहचली आहे. २७४४ जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या नवीन विषाणूमुळे अनेकांना न्यूमोनियाची लागण झाली असून ४६१ जणांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी नवीन ७६९ रुग्ण सापडले होते, तर २४ जणांचा मृत्यू झाला होता. रविवार अखेरीस न्यूमोनियाने मरण पावलेल्यांची संख्या ८० झाली असून आतापर्य़त ५१ रुग्ण विषाणूमुळे झालेल्या न्यूमोनियातून बरे झाले आहेत.

भारतातही करोनाचा संशयित

राजस्थानमध्ये करोना विषाणूची लागण झालेला एक संशयित रुग्ण आढळला आहे. त्या रूग्णाला आता स्वतंत्र विभागात ठेवण्यात आले आहे. हा रुग्ण चीनमध्ये एमबीबीएचा अभ्यासक्रम पूर्ण करून डॉक्टर झाल्यावर भारतामध्ये परतला आहे. त्याला करोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून एसएमएस रुग्णालयातील स्वतंत्र विभाघात ठेवण्या

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -