घरदेश-विदेशअंतराळ विश्वात चीननं रचला इतिहास

अंतराळ विश्वात चीननं रचला इतिहास

Subscribe

अंतराळ विश्वात चीननं नवा इतिहास रचला आहे. चीननं चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागावर अंतराळ यान उतरवले आहे.

अंतराळ विश्वात चीननं नवा इतिहास रचला आहे. चीननं चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागावर अंतराळ यान उतरवले आहे. अशी कामगिरी करणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. चांगे-४ असं या यानाचं नाव आहे. चांगे-४नं सकाळी १० वाजून ४६ मिनिटांनी चंद्राचा पृष्ठभागाला स्पर्श केला. अमेरिका माध्यामांनी याबाबतचं वृत्त दिलं आहे. यापूर्वी चीननं चंद्रावर रोवर यान देखील उतरवले होते. अमेरिका आणि रशियानं देखील चंद्रावर यान उतरवले होते. पण, पृथ्वीवरून न दिसणाऱ्या भागावर अंतराळ यान उतरवण्याची कामगिरी करणारा चीन हा पहिलाच देश ठरला आहे. अंतराळ क्षेत्रात चीन आता जगात वरच्या पातळीवर पोहोचला आहे. जी गोष्ट अमेरिकेला देखील जमली नाही. ती गोष्ट आम्ही साध्य केली. अशा शब्दात चीनच्या अंतराळ कार्यक्रमावर काम करणाऱ्या युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अॅड्ण टेक्नॉलॉजीचे प्रोफेसर झू मेंघूआ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चीन सध्या वेगानं विकास करत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रात अमेरिकेलाही चीन आव्हान देऊ शकतो. चीन २०२२पर्यंत तिसरे अंतराळ स्टेशन पूर्णपणे कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे. दरम्यान, चीनने चंद्राच्या अशा पृष्ठभागावर यान उतरवले आहे तिथे अद्याप कोणीही पोहोचू शकलेले नाही. त्यामुळे चीनचा आत्मविश्वास आणखीनच दुणावला आहे. काही तज्ञ्जांनी मात्र चांगे-४चं लॅडिंग हे प्रचाराशिवाय काहीही नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -