घरदेश-विदेशभारताच्या चिंतेत भर; चीनचे हेरगिरी करणारे जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल

भारताच्या चिंतेत भर; चीनचे हेरगिरी करणारे जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल

Subscribe

चिनी जहाजाची ट्रॅकिंग सिस्टम भारतीय प्रतिष्ठानांवर हेरगिरी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या भीतीने केंद्रीय यंत्रणा चिंतेत आहे.

चीन आणि भारत यांच्यातील तणाव सातत्याने वाढतोय. यात चीन भारताला डिचवण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र चीनचा प्रत्येक डाव भारतीय जवान मोडीत काढताना दिसतात. अशात चीनचे उपग्रह आणि क्षेपणास्त्र निरीक्षण करणारे जहाज आज सकाळी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल झाल्याने भारताच्या चिंतेत भर पडली आहे. श्रीलंकेकडून आधीच याला परवानगी दिली आहे.

वृत्तानुसार, श्रीलंकेने यापूर्वी भारत आणि अमेरिकेच्या चिंतेमुळे चीनला आपल्या जहाजाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यास सांगितले होते, परंतु काही दिवसांनंतर चीनने हे हेरगिरी जहाज हंबनटोटा बंदरात पाठवण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisement -

चिनी जहाजाची ट्रॅकिंग सिस्टम भारतीय प्रतिष्ठानांवर हेरगिरी करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या भीतीने केंद्रीय यंत्रणा चिंतेत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गेल्या महिन्यात सांगितले की, “आम्ही ऑगस्टमध्ये हंबनटोटा येथे चीनच्या जहाजाच्या प्रस्तावित भेटीच्या वृत्तांबद्दल माहिती आहे.

ते म्हणाले की, केंद्र सरकार भारताची सुरक्षा आणि आर्थिक हितसंबंध असलेल्या कोणत्याही घडामोडींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहे. तसेच त्याचे संरक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तथाकथित सुरक्षा चिंतेचा हवाला देत काही देशांनी श्रीलंकेवर दबाव आणणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे

- Advertisement -

जेव्हा श्रीलंकेने चीनला जहाजाच्या प्रवेशास स्थगिती देण्यास सांगितले, तेव्हा चीनने नाराजी व्यक्त केली. ज्यावर चीनने म्हटले की, काही देशांनी कोलंबोवर दबाव आणण्यासाठी कथित सुरक्षा चिंतेबाबत हवाला देणे आणि त्याच्या अंतर्गत बाबींवर पूर्णपणे हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने 13 ऑगस्ट रोजी सांगितले की, कोलंबोने काही समस्यांवर सखोल सल्लामसलत केली आहे.


धक्कादायक! रस्ता नसल्याने महिलेची घरातच प्रसूती, जुळ्या बालकांचा उपचारांअभावी मृत्यू

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -