घरदेश-विदेशभारत दौऱ्यावरून परतलेल्या अमेरिकेच्या CIA अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोम! भारतातील पहिलंच प्रकरण

भारत दौऱ्यावरून परतलेल्या अमेरिकेच्या CIA अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोम! भारतातील पहिलंच प्रकरण

Subscribe

हवाना सिंड्रोम नावाचा गूढ आजार अमेरिकेत पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी (सीआयए) चे संचालक विल्यम बर्न्स यांनी आता या आजाराच्या लक्षणांविषयी माहिती दिली आहे, जे जगातील शास्त्रज्ञांसाठी एक न समजणारे कोडे बनले आहे. अलीकडेच विल्यम बर्न्स अधिकाऱ्यांच्या टीमसह भारत दौऱ्यावर आले होते. ते भारतातून अमेरिकेत परतल्यानंतर त्यांनी हवाना सिंड्रोमच्या लक्षणांविषयी माहिती दिली आहे. त्याच्यासोबत दौऱ्यावर आलेले अधिकारी आणि त्यांचे नातेवाईक देखील या विचित्र रोगाची लक्षणे अनुभवत असल्याचे सांगितले जात आहे. हवाना सिंड्रोम भारतात आढळल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. लागण झालेले अमेरिकन अधिकारी सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांच्या शिष्टमंडळाचा भाग होते. त्यांना भारतात मुक्कामी असताना वैद्यकीय मदत घ्यावी लागली, असे सीएनएन आणि एनवायटीवरील अहवालात म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या सिंड्रोमचा पहिला रुग्ण २०१६ मध्ये क्युबामधील हवानामध्ये आढळला होता. त्यामुळे त्याला हवाना सिंड्रोम असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, अलीकडच्या काही वर्षांमध्ये हवाना या रहस्यमय न्यूरोलॉजिकल आजाराने रशिया, चीन, ऑस्ट्रिया आणि इतर अनेक देशांमधील अमेरिकन गुप्तहेर आणि मुत्सद्यांना ग्रासले आहे. गेल्या दोन महिन्यांत हवाना सिंड्रोमची प्रकरणे चर्चेत येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसच्या व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान याविषयीच्या बातम्याही समोर आल्या होत्या. कमला हॅरिस २४ ऑगस्टला व्हिएतनामला जाणार होत्या, परंतु हनोई येथील अमेरिकन दूतावासाने हवाना सिंड्रोमच्या जोखमीमुळे हा दौरा पुन्हा ठरवला होता.

- Advertisement -

८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे गुप्तहेर सीआयए प्रमुख विल्यम बर्न्स यांची दिल्लीत भेट घेतली होती. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता चालवणाऱ्या लोकांची नावे जाहीर केल्यानंतर यांच्यामध्ये बैठक झाली होती. ज्या अमेरिकन अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोमची लागण झाली आहे, ते अधिकारी देखील या बैठकीचा भाग असल्याचे सांगितले जात आहे.


jammu infiltration : दहशतवाद्यांची भारतात सर्वात मोठी घुसखोरी, १० दहशतवाद्यांविरोधात पॅरा कमांडोचे सर्च ऑपरेशन सुरु
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -