घरदेश-विदेशराजकीय नेते बदलतील, तुम्ही कायम आहात; गेल्या काही काळात विश्वास गमावलाय; सरन्यायाधीशांनी...

राजकीय नेते बदलतील, तुम्ही कायम आहात; गेल्या काही काळात विश्वास गमावलाय; सरन्यायाधीशांनी CBI ला सुनावलं

Subscribe

देशाची मुख्य तपास यंत्रणा असलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) च्या निःपक्षपातीपणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासंदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एनव्ही रमणा यांनी देशाची मुख्य तपास यंत्रणा सीबीआयला सल्ला देताना त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात सीबीआयच्या हलगर्जीपणा, निष्क्रियता आणि दिरंगाईमुळे तपास यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे न्यायमूर्ती रमणा यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात सांगितले. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होत असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले. अनेकदा पोलीस अधिकारी आमच्याकडे येऊन अत्याचार होत असल्याचे सांगतात. राजकीय प्रतिनिधी बदलत राहतात पण तुम्ही सदैव सेवेत आणि कर्तव्यात राहाल, अशा शब्दांत रमणा यांनी सीबीआयला खडेबोल सुनावले.

विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात सरन्यायाधीश रमणा यांनी ब्रिटिश राजवटीपासून भारतातील पोलीस व्यवस्थेत केव्हा आणि किती बदल झाला यावर भर दिला. पण कालांतराने सीबीआयसारख्या तपास यंत्रणा सार्वजनिक निगराणीखाली आल्या आहेत. सरन्यायाधीश म्हणाले की, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. सार्वत्रिक निवडणुकांनंतर सरकार बदलल्यानंतर नवीन सरकारे आपला छळ करतात, अशा तक्रारी घेऊन अनेकदा पोलीस अधिकारी आमच्याकडे येतात, असे रमणा म्हणाले.

- Advertisement -

सरकारे बदलतील, तुम्ही कायम आहात

लोकप्रतिनिधी आणि सरकारे बदलतात पण तुम्ही कायमस्वरूपी आहात हे लक्षात ठेवा. राज्यकर्ते बदलतात पण प्रशासन आणि सुव्यवस्था कायम राहते. त्यांच्या मते कोणतीही संस्था त्यांच्या नेतृत्वामुळे चांगली किंवा वाईट असू शकते. पण काही अधिकारी मोठा फरक करू शकतात.

न्यायमूर्ती रमणा यांनी म्हटले की, तपास यंत्रणांना स्वतंत्र, स्वायत्त बनवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. एकाच गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अनेक एजन्सींवर जबाबदारी सोपवल्याने तपास छळाचे कारण बनतो. गुन्हा दाखल झाला की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधी त्याचा तपास कोणती एजन्सी करणार हे ठरवायला हवे. परंतु अलिकडच्या वर्षांत असे दिसून आले आहे की अनेक एजन्सी एकाच गुन्ह्याचा किंवा खटल्याचा तपास करण्यासाठी गुंतलेल्या आहेत, असे रमणा म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -