घरताज्या घडामोडीबाळासाहेब ठाकरेंच्या मराठी भाषेतील टोले आम्ही अनुभवले : अजित पवार

बाळासाहेब ठाकरेंच्या मराठी भाषेतील टोले आम्ही अनुभवले : अजित पवार

Subscribe

मराठी भाषा भवन इमारतीच्या भूमिपूजन सोहळा आज मुंबईत पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. मराठी भाषा भवन मुख्यकेंद्राचं भूमीपूजन मुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते झालं. तसेच सर्वांच्या उपस्थितीमध्ये झालं. त्याबद्दल अजित पवारांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु बाळासाहेब ठाकरेंच्या मराठी भाषेतील टोले आम्ही अनुभवले असं अजित पवार म्हणाले.

बाळासाहेब ठाकरेंच्या मराठी भाषेतील टोले आम्ही अनुभवले

गुढीपाडव्याच्या अजित पवारांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी मिळून आम्ही निर्णय घेतला होता की, गुढीपाडव्याच्या दिवशी चार महत्त्वाच्या वेगवेगळ्या विभागाचे कार्यक्रम मुंबईमध्ये घ्यायचे. यामध्ये मेट्रोचा कार्यक्रम, जीएसटी भवनचा कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांसह गृहविभाग खात्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

- Advertisement -

मुंबईमधील मरिन ड्राईव्ह सारख्या ठिकाणी ही इमारत होणार आहे. मराठी भाषेला मोक्याची जागा मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी भाषातील टोले आम्ही अनुभवले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मराठी भाषा वेगळी आहे. ते समोरच्याला हळूहळू गुदगुल्या करतात, असं पवार म्हणाले.

नवी मुंबईमध्ये ब्रँच काढण्याचा प्रयत्न

राज्याच्या मराठी भाषा विभागातर्फे आणि मराठी भाषेच्या विकास संवर्धनासाठी बरेच वर्ष अनेक सरकारं यामध्ये प्रयत्न करत होते. मात्र, त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या. मराठी भाषा भवन हे मुंबईमध्ये झालं पाहीजे, हे राज्यकर्त्यांची त्यापासूनची इच्छा होती. दिवाकर राऊते या गोष्टीचे साक्षीदार आहेत. अनेक जणांनी हा विषय सभागृहामध्ये मांडला. तसेच दिवाकर राऊते यांनी सुद्धा हा विषय सभागृहात मांडला. यामधून अनेक प्रश्न निर्माण व्हायचे. परंतु ते काम पूर्णत्वला जात नव्हतं. नवी मुंबईमध्ये सुद्धा जागा घेण्यात आली आहे. पण मी मराठी भाषा भवन येथे होणार आहे. मात्र, त्याची ब्रँच नवी मुंबईमध्ये काढण्याचा प्रयत्न आहे.

- Advertisement -

मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा द्यावा अशी मागणी आम्ही केंद्राला केली आहे. केंद्रानेही याबाबतील सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. आपली भाषा बहुज्ञात कशी होईल याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. मराठी भाषा फक्त ओठातून नको तर पोटातून यायला पाहिजे. भाषा ही उद्योगाची असली पाहिजे, असं अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : New Corona Varient : कोरोनाचा नवीन XE व्हेरियंट Omicron BA.2 पेक्षा १० पटीने धोकादायक, WHO चा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -